
आपल्या दररोज अन्नामध्ये हा एक घटक जोडण्याने ते खूप पौष्टिक बनते. आपण नेहमीच आहारात मोठे बदल करण्याविषयी बोलतो, मात्र छोट्या छोट्या, महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलत नाही. ज्या करायला सोप्या आहेत आणि त्यांचा आपल्या शरीराला खूपच फायदा आहे. मी आज तुम्हाला ‘जवस’ (flaxseeds) खाण्याचे फायदे सांगणार आहे. बहुतेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये जवस असतेच. ते सहजपणे उपलब्ध आहे आणि सर्वांना परवडेल, असं आणखी एक सुपरफूड आहे.
ओमेगा-३ आणि ओमेगा-६ हे असे दोन आवश्यक फॅटी ॲसिड्स आहेत, जे आपल्याला आपल्या शरीरामध्ये तयार करता येत नाहीत. म्हणूनच आपल्याला ते जेवणातून शरीराला पुरवावे लागतात. या दोघांपैकी आपण आज ‘ओमेगा-३’च्या आरोग्यविषयक फायद्यांबद्दल बोलणार आहोत. ‘ओमेगा-३’ एकतर फिश ऑइलमधून किंवा जवस खाऊन आपल्याला मिळू शकते. आपण आज ‘जवस’ हे रोजच्या आहारात घटक म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करू या.
‘ओमेगा -३’ फॅटी ॲसिडचे फायदे
अशी सामान्यपणे आढळणारी वस्तू आणि एवढी महत्त्वपूर्ण कार्ये! जवस आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरणे खूपच सोपे आहे. ते पोषणात भर घालण्यासाठी कोणत्याही खाद्यपदार्थात वापरले जाऊ शकते. जवस वापरून तुम्ही चटणी, लाडू बनवू शकता, जेवणात टॉपिंग म्हणून घालू शकता, त्याची छान चपाती बनवा किंवा कमीतकमी आपल्या चपातीच्या पिठात मिसळा आणि गव्हाच्या पिठाचा वापर थोडा कमी करा. जवस आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करणे खूप सोपे आहे आणि आता आपल्याला त्याचे फायदेही माहीत आहेत. आता वेळ घालवू नका. आपल्या किराणा यादीत हा घटक आत्ताच ॲड करा!
(लेखिका राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू, प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट आहेत. त्या HaloMiFitness या स्टार्टअपच्या संस्थापक सीईओ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.