माझा फिटनेस : आनंददायी आरोग्य...

श्वेता परदेशी, अभिनेत्री, नृत्यांगना
Tuesday, 8 September 2020

आपण कोणत्याही क्षेत्रात असो, फिटनेस हा महत्त्वाचा घटक आहे. मी अभिनय आणि नृत्य क्षेत्रात आहे. त्यामुळे मला फिटनेस गरजेचा आहे. मी वेलनेस कोचही आहे. मी दररोज सकाळी साडेपाच वाजता उठते. त्यानंतर पुरुष आणि महिलांचे क्लासेसही घेते. त्यांना वजन कमी करण्यासाठी, लठ्ठपणा आणि मधुमेह अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी डाएट देते

आपण कोणत्याही क्षेत्रात असो, फिटनेस हा महत्त्वाचा घटक आहे. मी अभिनय आणि नृत्य क्षेत्रात आहे. त्यामुळे मला फिटनेस गरजेचा आहे. मी वेलनेस कोचही आहे. मी दररोज सकाळी साडेपाच वाजता उठते. त्यानंतर पुरुष आणि महिलांचे क्लासेसही घेते. त्यांना वजन कमी करण्यासाठी, लठ्ठपणा आणि मधुमेह अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी डाएट देते. दिवसभरात मी कमीत कमी दहा सेशन्स घेते. हे करत असतानाच स्वतः सकाळी एक ते दीड तास वर्क-आउट करते. त्यापूर्वी म्हणजेच झोपेतून उठल्यानंतर गरम पाणी पिते. त्यामध्ये हळद किंवा लिंबू टाकते. त्याने पोट साफ होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी वर्कआउट वेगवेगळ्या प्रकारे करते. दोन दिवस कार्डीयो, दोन दिवस वेट ट्रेनिंग आणि दोन दिवस योगासने व प्राणायाम करते. आठवड्यातून एक दिवस शरीराला आराम देते. हे करताना दररोज एक तास न्यूट्रिशियनचा अभ्यासही करते. कारण, मला त्यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. मी मेडिकल बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी केले आहे. त्यानंतर वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. त्यामुळेच वेलनेस कोच म्हणून काम करत आहे. 

माझा आहार हेल्दी असतो. मी शक्यतो हॉटेलमधील पदार्थ खात नाही. फळे आणि सॅलेड मला जास्त आवडतात. नॉनव्हेजमध्ये फिश खाते. प्रोटीनसाठी पनीर, मशरूम, कडधान्य, तोफो यांचा आहारात समावेश असतो. त्याचप्रमाणे अक्रोड व बदाम माझ्या आहारात नियमित असतात. मी झणझणीत खाल्ल्यावर ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घेते. एशियन बुक्समध्ये ‘मोस्ट एरोबिक्स परफॉर्मन्स इन अ डे’ असे माझे रेकॉर्ड झालेले आहे. मी २०१२मध्ये ‘होणार डान्सिंग स्टार’ या नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये मला ‘तकदीर की टोपी’ मिळाली. ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात मी फायनलपर्यंत गेले. त्याचबरोबर ‘तुझ्याविना राणी’ आणि ‘आला ग पाडवा’ हे दोन अल्बम साँग मी प्रोड्युस आणि डिरेक्ट केली आहे.

त्याचप्रमाणे ‘आटपाडी नाइट्स’ या चित्रपटातही मी पहिल्यांदाच काम केले. विशेष म्हणजे  झी गौरव पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले ही माझ्यासाठी नक्कीच आनंददायी बाब आहे. क्षेत्र कोणतेही असो, सर्वांनी आरोग्याकडे, फिटनेसकडे आणि तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे, ते तुमच्याच फायद्याचे आहे. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shweta pardeshi on my fitness