चेतना तरंग : श्रद्धा आणि स्मृती

Ravishankar
Ravishankar

ध्येय कसे गाठायचे हे समजण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याची चर्चा आपण या पुढील लेखात क्रमाक्रमाने करणार आहोत. सर्वांत  पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा. श्रद्धा नससल्यास जीवनात प्रगतीच होणार नाही. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर तुम्हाला विश्‍वास ठेवावा लागतो. निसर्ग नियमांवर श्रद्धा ठेवायला लागते. तुम्हाला त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, नाहीतर कधी कोणती गोष्ट घडेल याचा तुम्हाला सतत मागोवा घ्यायला लागतो. सगळे विज्ञान हे शेवटी निसर्ग-नियमांवरच बेतलेले आहे. तुमच्या आसपासच्या लोकांवर विश्‍वास टाका, जगावर भरवसा ठेवा. अव्यक्त आहे, दिसत नाही त्यावर श्रद्धा ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निसर्गावर विश्‍वास ठेवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुम्ही निसर्गाकडे बघा. त्यातल्या अनेक अदृश्‍य तरल पातळ्यांवर वसलेल्या त्या ईश्वरावर, ‘परब्रह्मावर’ तुम्ही विश्‍वास टाकता. त्याला तुम्ही काहीही नाव द्या, परंतु त्या शक्तीवर भरवसा ठेवा. विचारांसकट सगळ्याच गोष्टी त्या शक्तीतून निर्माण होत असतात. त्या शक्तीवर तुमची पूर्णपणे श्रद्धा बसल्यावर तुम्हाला तुमचे जीवनसुद्धा परिपूर्ण झाल्यासारखे वाटेल. श्रद्धेचा अभाव असलेले जीवन काळजी, दु:ख, विवंचना यांनी ग्रासून गेलेले असते. तणावग्रस्त मन कधीच आनंदी आणि प्रसन्न राहू शकत नाही. इतकेच काय, अशा परिस्थितीत तुम्ही जीवनात काही साध्यही करू शकणार नाही. म्हणूनच श्रद्धेमुळे तुमच्या जीवनाला पूर्णत्व येते. ईश्वरावर भरवसा आणि श्रद्धा ठेवा, भविष्यात सगळ्याच गोष्टी चांगल्या आणि तुमच्या मनासारख्या घडतील यावर विश्‍वास आणि श्रद्धा ठेवा.

दुसरी गोष्ट म्हणजे स्मृती. तुम्ही काय करता, तुमचा जन्म कुठे झाला... इत्यादी गोष्टी आठवणे याला स्मृती म्हणतात. आपण आपले वाढदिवस साजरे करत असतो. ‘आज मला कोणत्या भेटी मिळतील?’ किंवा ‘कोणती भेट मी आज देऊ?’ आपले सगळे लक्ष जीवनाऐवजी भेटीमध्येच गुंतलेले असते. कोणी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाची आठवण करून दिली तर तुम्ही म्हणता, ‘हा बरोबर, या दिवशीच माझा जन्म झाला होता.’ मग तुमचे विचारचक्र सुरू होते.

‘मी आयुष्याची चाळीस, पन्नास वर्षे फुकट घालविली. मी काही साध्यही केले नाही किंवा आनंदाने जीवनही जगलो नाही,’ असा विचार करून तुम्हाला पश्चात्ताप होतो. दु:ख होते. आणि म्हणूनच तुमचे दु:ख शीतल करण्यासाठी लोक तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने भेटी देत असतील. त्यामुळे ज्याच्या वाढदिवस असेल तो स्वत:चे दु:ख विसरून त्या मिळालेल्या भेटीत रममाण होत असावा.

आपल्याला काळ वेळाचे भान नसते, आपल्या शरीरात काय चालले आहे याची आपल्याला कल्पना नसते. आपले शरीर अनेक गोष्टींपासून बनलेले आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या शरीरात रक्ताभिसरण सतत सुरू असते, हृदयाच्या ठोक्यांची जाणीव तुम्हाला होते का? तुम्ही उत्साही असाल तेव्हा इतर गोष्टींमध्ये गुंतलेले असता. त्यामुळे तुमच्यातल्या संवेदनांची अनुभूती तुम्हाला कधी मिळत नाही. आपल्याच शरीरात काय चालले आहे हे आपल्याला कळत नाही. हा क्षण आपला आहे, भूत आणि भविष्यकाळ आपल्या स्मृतीत नसतो, हे नक्की.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com