चेतना तरंग : तुम्ही तुमच्या मनाला हाताळा

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
Tuesday, 24 November 2020

‘योगी झोपतो, तेव्हा इतर सर्वजण जागे असतात आणि इतर सर्वजण झोपतात तेव्हा योगी जागा असतो,’ असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. याचा अर्थ काय? प्रत्येक जण प्रक्षुब्ध आणि काळजीत असताना योगी आरामात झोपलेला असतो, असा त्याचा सरळ अर्थ आहे. सर्वसाधारणपणे सगळ्या गोष्टी या चांगल्यासाठीच घडत असतात आणि त्यांच्यामुळे चांगलेच निष्पन्न होत असते, हे योग्यांना ठाऊक असते, तो विश्वास योग्यांमध्ये असतो.

‘योगी झोपतो, तेव्हा इतर सर्वजण जागे असतात आणि इतर सर्वजण झोपतात तेव्हा योगी जागा असतो,’ असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. याचा अर्थ काय? प्रत्येक जण प्रक्षुब्ध आणि काळजीत असताना योगी आरामात झोपलेला असतो, असा त्याचा सरळ अर्थ आहे. सर्वसाधारणपणे सगळ्या गोष्टी या चांगल्यासाठीच घडत असतात आणि त्यांच्यामुळे चांगलेच निष्पन्न होत असते, हे योग्यांना ठाऊक असते, तो विश्वास योग्यांमध्ये असतो. ‘‘ज्या वेळेस इतर सर्वजण झोपलेले असताना योगी जागा असतो,’’ याचा अर्थ योग्यांना जीवनाचे वास्तव आणि सत्यता, याची पूर्ण कल्पना असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘माझा शेवट कशात होणार आहे? मी कुठे जाणार आहे? जीवन म्हणजे काय? मी कोण आहे,’’ असे प्रश्न कोणाच्या मनात येत नाहीत. याचाच अर्थ लोक झोपलेले असतात. सिनेमा, व्हिडिओ गेम पाहण्यातच लोक मग्न झालेले असतात. अगदी उतार वयातही लोक व्हिडिओ गेम खेळताना दिसतात. लोक जीवनाकडे गंभीरतेने पाहत नाहीत. ‘‘माझ्या मनात अनेक इच्छा आणि वासना साठलेल्या आहेत, त्यांना काढून माझे मन मी कसे साफ करू?’’ हा विचार लोकांच्या मनात येत नाही. तुमच्या मनावरचे संस्कार तुम्ही वेळीच साफ केले नाहीत, तर तसेच मळकटलेले मन घेऊन तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागतो.

म्हणून, मरताना अंतकाली तुमचे मन स्वच्छ झालेले पाहिजे. आनंदी आणि प्रसन्न असायला पाहिजे. जो झोपलेला असतो तो स्वत:च्या मनात भावभावनांचा कचरा साठवत जगत असतो. याबाबतीत योगी मात्र सजग असतो. तो कोणाच्याच भावभावनांचा कचरा आपल्या मनात साठवत नाही. ‘हा माणूस मला असे का म्हणाला? किंवा ती बाई मला असे का म्हणाली?’ असले विचार करत तो कधी बसत नाही. इतरांचा विचार करण्यामुळे मन पूर्णत: उद्ध्वस्त होते. इतर लोकांच्या उणिवांमुळे आणि सदोष पद्धतीने वागण्यामुळे आपल्याला भयंकर मनस्ताप होतो. इतरांच्या उणिवा त्यांच्या त्यांना निस्तरू द्या. तुम्ही फक्त तुमचे मन हाताळा आणि तुमच्यातले दोष दूर करा. तेवढे पुरेसे आहे. दुसऱ्या लोकांचे दोष स्वीकारण्याएवढा संयम तुमच्यात आहे का, याचा आधी विचार करा आणि मग त्यांचे दोष आणि उणिवा स्वीकारा. तुम्ही दयाळू अंत:करणाचे असाल, इतरांच्या दोषांचा किंवा चुकांचा परिणाम तुमच्या मनावर किंवा शरीरावर होणार नाही याची तुम्हाला खात्री असल्यास तुमच्या परीने त्यांना सुधारण्याचा शक्य तितका प्रयत्न करा, नाहीतर हे सर्व निसर्गावर सोडून द्या, तोच यातून मार्ग काढेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar on mind

Tags
टॉपिकस
Topic Tags: