नऊ महिने घरातून काम करतोय; पाठदुखी सोडेना पाठ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

‘बरोबर नऊ महिने घरातून काम करतोय. परंतु, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पाठ खूप दुखायला लागलीय. दिवसेंदिवस या वेदना असह्य होऊ लागल्यात. अखेर डॉक्‍टरांकडे गेलो. त्यांनी तपासलं. नंतर डॉक्‍टरांनी सांगितलं, दोष पाठीत नाही, तुमच्या काम करायला बसण्याच्या पद्धतीत आहे...’’ प्रख्यात माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंते राहुल जोशी ‘सकाळ’बरोबर बोलत होते.

बसण्याची अयोग्य पद्धत, बैठ्याकामामुळे चाळिशीतच दुखणे
पुणे - ‘बरोबर नऊ महिने घरातून काम करतोय. परंतु, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पाठ खूप दुखायला लागलीय. दिवसेंदिवस या वेदना असह्य होऊ लागल्यात. अखेर डॉक्‍टरांकडे गेलो. त्यांनी तपासलं. नंतर डॉक्‍टरांनी सांगितलं, दोष पाठीत नाही, तुमच्या काम करायला बसण्याच्या पद्धतीत आहे...’’ प्रख्यात माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंते राहुल जोशी ‘सकाळ’बरोबर बोलत होते.

कोरोना उद्रेकानंतर २० मार्चपासून घरातून काम सुरू झालं. घरात कामाची जागा निश्‍चित केली. तासन्‌ तास एकाच जागेवर बसून कामाचा निपटारा होऊ लागला. मात्र, आता पाठीचा त्रास होऊ लागला. त्या दुखण्याचं मूळ निघालं कामाला बसण्याच्या अयोग्य पद्धतीत... जोशी त्यांचा अनुभव सांगत होते. 
काही जणांनी पाठदुखीमुळे घरातील बसण्याच्या खुर्च्या बदलल्या. जागा बदलल्या. काहींनी काम करण्यासाठी बसण्याची पद्धत बदलली. परंतु, वयाच्या चाळिशीतच आलेली पाठदुखी कमी होत नसल्याचे वेगवेगळे अनुभव लॉकडाउननंतर आता जाणवत असल्याचं निरीक्षण वेगवेगळ्या डॉक्‍टरांनी नोंदविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कशामुळे वाढली पाठदुखी?

  • सातत्याने खाली मान घालून मोबाईलमध्ये बघणे
  • शरीराची ठेवण योग्य नसणे
  • व्हिटॅमिन डी आणि बी-१२ ची कमतरता
  • सातत्याने वातानुकूलित खोलीत बसणे
  • फास्ट फूड
  • चुकीची जीवनशैली

ऑनलाइनचा दुष्परिणाम
शाळा, कार्यालयातील कामे सगळी ऑनलाइन होऊ लागली आहेत. त्या प्रमाणात मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातून शाळकरी मुलांमध्येही पाठीच्या समस्यांनी डोके वर काढल्याचे अस्थिरोग तज्ज्ञांनी सांगितले.

जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

शून्य पाठदुखी
झिरोबॅकेक अशी नवीन संकल्पना उदयास येत आहे. म्हणजे पाठीच्या समस्या शून्यावर आणायच्या. त्यासाठी शरीराची ठेवण महत्त्वाची असते. शरीरावर नेमका कुठे बाक आला आहे का, पोट सुटलंय का, मणक्‍यांत गॅप जाणवते का, स्थूलता या आणि अशा अनेक कारणांपैकी पाठदुखीचे कारण कोणते, हे शोधण्याचा प्रयत्न यात होतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, कामाचे ठिकाण, कामाची वेळ याचा शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. विविध विकार जडत असल्याने त्यावर प्रभावी उपचार कोठे उपलब्ध आहेत, याची माहिती किंवा त्याबाबत असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांविषयी सर्व रुग्णांना माहिती नसतात. त्यामुळे रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्याच्या आजाराचे प्रमाण वाढलेले असते. आपल्याला होणाऱ्या त्रासाविषयी वेळीच काळजी घेतली पाहिजे.

व्यायाम, योगासने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाठदुखी आणि मणक्‍याचे ९० ते ९५ टक्के विकार शस्त्रक्रियेविना बरे होऊ शकतात. या आजारात केवळ ५ ते १० टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते.
- डॉ. नरेंद्र वैद्य, व्यवस्थापकीय संचालक, लोकमान्य हॉस्पिटल

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Back Pain Sickness Health care