
रळ आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं.
नवी दिल्ली : नारळ आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. मग भलेही तो सुखा नारळ असो वा पाणी असणारा नारळ असो. अनेक आजारांमध्ये नारळ खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटामिन-सी सारखे पोषक तत्त्व असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. गर्भारपणात डॉक्टर महिलांना नारळ खाण्याचा तसेच त्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ केवळ आपल्या शरीराला मजबूती देत नाहीत, तर आपल्या चेहऱ्याला तजेलदार बनवण्यात देखील मदत करतात. तर जाणून घेऊयात प्रेग्नंसीदरम्यान नारळ खाण्याचे काय फायदे होतात.
1. प्रेग्नंसीदरम्यान महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. जर या काळात महिलांनी अनेक पोषक तत्त्वांनी युक्त नारळ पाण्याचे सेवन केलं तर त्यांना खूपच फायदा होऊ शकतो.
2. नारळाने फक्त महिलांनाच नव्हे तर त्यांच्या गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाच्या वाढीसाठी देखील फायदा होतो.
3. नारळ पाणी पिल्याने मूत्राशयाशी संबंधित समस्या अजिबातच येत नाहीत. प्रेग्नंसी दरम्यान मूत्राशी निगडीत आजार निष्पन्न होऊ नयेत म्हणून नारळ पाणी पिणे, आवश्यक मानलं जातं.
4. प्रेग्नंसी दरम्यान महिलांना एसिडीटीची समस्या होते. नारळ पाण्यामुळे पोटात बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही. तसेच आतड्यांशी निगडीत अडचणींवर देखील हे गुणकारी ठरते. नारळ पाणी पिल्याने पचन शक्ती वाढते.
5. प्रेग्नंसी दरम्यान महिलांना थकवा आणि डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते. नारळ पाण्याचे सेवन केल्याने या प्रकारच्या समस्या दूर होतात.