नियमित व पुरेसे पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्‍यक असते.

पाणी म्हणजे जीवन. आपल्या आरोग्यासाठी नियमित व पुरेसे पाणी पिणे आवश्‍यक आहे. शरीरामध्ये साठ टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्वाचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्‍यक असते.

हे महत्वाचे...

 • सामान्यपणे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे. उन्हाळ्यात प्रमाण जास्त ठेवावे. जेणेकरून पचनाचे विकार होणार नाहीत.
 • शरीराला आवश्‍यक एवढ्या पाण्याचे सेवन न केल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, अर्धशिशी यांसारखे आजार उद्‌भवू शकतात.
 • बध्दकोष्ठता सध्या सर्वसाधारणपणे आढळला जाणारा आजार आहे. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास बध्दकोष्ठतेचा आजार दूर होऊ शकतो.
 • मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजनदेखील कमी होण्यास मदत होते.
 • पाण्यामुळे चयापचयाचे प्रमाण वाढते.
 • त्वचा तजेलदार व तुकतुकीत दिसण्यासाठी पाण्याची मदत होते.
 • त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी त्वचा संरक्षणात्मक म्हणून काम करत असते.
 • शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या पडतात.
 • अतिथंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्याने तहान लागत नाही. थंड पाणी आतड्यांतून शोषून घेतले जाते. त्यामुळे फ्रीजमधील पाणी आरोग्यास हितकारक नाही.
 • सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिल्यास दिवसभर पचनास त्रास होत नाही.
 • शरीराकडून मिळणाऱ्या संकेतानुसार व तहानेनुसार पाणी प्यावे. शरिराला किती प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
   

आयुर्वेदामध्ये पाण्याला जीवन मानले आहे. जेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने वजन कमी होते. जेवणादरम्यान प्यायल्याने वजन नियंत्रित राहते. तर जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्यास वजन वाढते. बाहेरून आल्यास लगेच पाणी पिऊ नये. - डॉ. सुनील पाटील  

 

kolhapur

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the benefits of regular and adequate water drinking