सेलिब्रेशनवेळी शैम्पेन उडवलीए? जाणून घ्या याबाबतच्या काही खास गोष्टी |champagne | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

champagne

सेलिब्रेशनवेळी शॅम्पेन उडवलीए? जाणून घ्या याबाबतच्या काही खास गोष्टी

शॅम्पेन (Champagne) हे नाव अनेकदा विजयाच्या सेलिब्रेशनशी (Celebration) जोडले जाते, मग तो टीम इंडियाचा विजय असो किंवा एखाद्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील विक्रमी यश असो, शॅम्पेन उघडणे आणि ती एकमेकांवर शिंपडणे हे सामान्य आहे. पण आजच्या काळात त्याचा ट्रेंड इतका वाढला आहे की, लोक सेलिब्रेशनमध्ये शॅम्पेन उडवणे सामान्य समजू लागले आहेत. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, हे नेमक काय आहे? ही वाइन आहे का? आणि असेल तर त्यात किती दारू आहे? चला तर मग जाणून घेऊया शॅम्पेनमागची संपूर्ण कहाणी. (Know Some Special Things About Champagne)

हेही वाचा: तरूणांपेक्षा ज्येष्ठांचे मद्य सेवन करण्याचे प्रमाण अधिक; संशोधनातून माहिती आली समोर

शॅम्पेन म्हणजे काय?

घरच्या पार्टीच्या वेळी सहसा घरातील वडीलधाऱ्यांच्या मनात 'या शॅम्पेनच्या बाटलीत नेमके काय भरले आहे' असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, तुम्हाला वाईन, बिअर, वोडका यामध्ये काय भरलेले असते हे माहिती असेलच, पण शॅम्पेनमध्ये (What Type of Content In Champagne) काय भरले जाते? शॅम्पेनमध्ये कोणताच असा वेगळा पदार्थ भरलेला नसतो. तर शॅम्पेन म्हणजे स्पार्कल वाइन (Sparkle wine) होय. म्हणजे, सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, शॅम्पेनच्या बाटलीत वाइन भरलेली असते आणि ही वाइन स्पार्कल वाइन असते, जी खास पद्धतीने बनवली जाते. यामुळे, शॅम्पेनमध्ये लहान फुगे दिसतात आणि म्हणूनच बाटली हलवल्यावर आणि उघडल्यावर फेस बाहेर येतो. (Champagne Menes What )

स्पार्कल वाईन कशी बनवली जाते?

स्पार्कल वाईन (Sparkle wine) बनवण्यासाठी आधी वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षांचा रस काढला जातो आणि त्यात काही पदार्थ टाकून किण्वन केले जाते. यासाठी, ते प्रथम एका टाकीत ठेवले जाते आणि फर्मन्टेशन प्रक्रियेत दीर्घकाळ म्हणजे बरेच महिने किंवा अनेक वर्षे ठेवले जाते. यानंतर, त्या बाटल्यांमध्ये भरले जाते आणि बाटल्या अनेक वर्षे उलट्या ठेवल्या जातात आणि आंबवण्यासाठी ठेवले जाते.

बराच काळ बाटली उलटी का ठेवता?

फर्मन्टेशननंतर त्यात कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल तयार होते. बराच वेळ असे केल्यानंतर पुन्हा एकदा कॉर्क झाकणाच्या जागी लावला जातो आणि ते बर्फात ठेवले जाते. यामुळे दाबामुळे बर्फ आणि घाण बाहेर येते. त्यानंतर ही बाटली पुन्हा अनेक दिवस उलटी ठेवली जाते आणि त्यानंतर ही चमचमीत वाइन तयार होते.

स्पार्कलिंग वाइनचे सेवन किती अल्कोहोलयुक्त आहे?

जर आपण अल्कोहोल टक्केवारीबद्दल बोललो तर त्यात 11% पर्यंत अल्कोहोलची मात्रा असते. ही एक प्रकारची वाइन आहे.

शॅम्पेन नावाची कथा

सर्व शॅम्पेन स्पार्कलिंग वाइन आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की, सर्व स्पार्कलिंग वाइन शॅम्पेनच आहेत. वास्तविक, फ्रान्समध्ये एक प्रदेश आहे, ज्याचे नाव शॅम्पेन आहे. म्हणजेच, फ्रान्सच्या शॅम्पेन प्रदेशात बनवलेल्या स्पार्कलिंग वाइनला शॅम्पेन असे म्हणतात. मात्र, इतर देशांमध्ये बनवलेली स्पार्कलिंग वाईन वेगळ्या नावाने ओळखली जाते. (History Of Champagne Name)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AlcoholCelebrationWine
loading image
go to top