
महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक
बऱ्याच लोकांना जिमचा फोबिया असतो, ते वेट्स आणि मशिनसह व्यायाम करणे टाळतात; पण मैदानी आणि बॉडीवेट वर्कआउट्स करण्यास प्राधान्य देतात. सुरुवात करताना आपल्याला कोणते वर्कआउट्स आवडतात ते पाहावे. असे वर्कआउट्स ज्यामुळे आपल्याला आपली फिटनेसची उद्दिष्ट्ये साध्य करता येतील. काही ट्रेनर असे म्हणतात, की बॉडीवेट वर्कआउट्स हा एक उत्तम पर्याय आहे, तर काही जण वेट ट्रेनिंग आणि मशिनसह व्यायाम करणे योग्य मानतात. आज आपण या दोन्हीबद्दल सविस्तर चर्चा करू या. त्यानंतर आपण काय करावे हे आपल्याला ठरवता येईल.