कॅल्शियमच्या कमतरतेचे हे आहेत भयानक परिणाम; जाणून घ्या काय आहेत लक्षणे

calcium
calcium

पुणे : आपल्या दातांमध्ये तसेच हाडांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असतं. तर उरलेलं 1 टक्के कॅल्शियम मांसपेशींच्या आकुंचन आणि प्रसरणाने शरिरातील अन्य भागांकडून मेंदूपर्यंत संदेश पाठवण्याचे काम करतं. यामुळे हे नक्की आहे की, कॅल्शियम आपल्या शरिरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या शरिराच्या चांगल्या कामकाजासाठी कॅल्शियमची अत्यंत गरज असते. जर आपल्या शरिरात कॅल्शियम कमी पडू लागले तर आपल्या शरिरातील हाडांमधील कॅल्शियम काढून त्याचा वापर केला जातो. सुरवातीला आपल्या शरिरात कमी कॅल्शियम आहे, हे आपल्याला कळत नाही मात्र जेंव्हा मोठ्या काळासाठी ही परिस्थिती आहे तशीच राहते तेंव्हा ती भयानक रोगाचे स्वरुप प्राप्त करते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक मुले आवश्यक त्या प्रमाणात उंच होत नाहीत. नेमकी काय आहेत कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे?  याविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे:

  • फिट येणे
  • थकावट आणि कमजोरी
  • दातांमध्ये कीड
  • एलर्जीचा त्रास
  • कमकूवत नखे
  • उच्च रक्तदाब
  • विसरभोळेपणा
  • अनिद्रा
  • मंद भूक
  • हिरड्यांचे आजार
  • रुक्ष त्वचा
  • कमकूवत प्रतिकारशक्ती
  • हात सुन्न होणे

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणते आजार होऊ शकतात?
जर एखाद्या व्यक्तीमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याला मोदीबिंदू, ऑस्टियॉपोरोसिस, रिकेट्स, टेटनी, ऑस्टियोमेलासिया, रुमेटाइड, अर्थारायटीस, मोनोपॉजच्या समस्या, ब्लड प्रेश आणि हार्ट अटॅक सारख्या समस्या उद्भवू शकतात.
कशी भरुन काढाल कॅल्शियमची कमतरता?
जर आपल्या शरिरात वरील लक्षणे दिसत असतील तसेच कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्याला संत्री, किवी आणि एप्रिकॉट ही फळे खायला हवीत. ही फळे कॅल्शियमचे स्त्रोत मानले जातात. या फळांशिवाय आपल्याला चीज अथवा पनीर खायला हवं. आपल्या डायटमध्ये विटामिन डीचे प्रमाण अधिक असायला  हवे. आपल्या खाण्यात मीठाचे प्रमाण कमी असायला हवे तसेच धूम्रपान सोडायला हवे. आपल्याला कॅल्शियम वाढवण्यासाठी मिल्क प्रोडक्ट्स, सिंहपर्णीची पाने, ब्रोकली, पालक, टोफू, पिस्ता, सुखा मेवा, अंजीर आणि बदाम खायला हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com