esakal | कोरोना काळात मधुमेही रुग्णांनो घ्या विशेष काळजी! रेटिनोपैथीचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

ratinopathy.jpg

रेटिनोपैथीचा धोका टाळण्यासाठी, वेळोवेळी डोळ्यांची स्क्रीन तपासणी करुन घ्या. जर तुम्हाला 5 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाचा त्रास होत असेल तर दर महिन्याला तुमची तपासणी केली पाहिजे.

कोरोना काळात मधुमेही रुग्णांनो घ्या विशेष काळजी! रेटिनोपैथीचा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोना विषाणूने अख्खा जगात थैमान माजवले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत असून बळींची संख्याही आश्चर्यकारक आहे. पण यामध्ये विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांचे या व्हायरसने सर्वाधिक बळी घेतले आहेत. भारतात सुद्धा कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे आणि सर्वाधिक कोरोनाबाधित हे मधुमेह असलेले रुग्ण आहेत. असे स्पष्ट करण्यात आले त्यामुळे प्रशासन सुद्धा मधुमेह असलेल्या रुग्णांना वारंवार अधिकाधिक काळजी घ्यायला सांगत आहे. कोविड साथीच्या वेळी मधुमेह रूग्णांना रेटिनोपैथीचा (डोळ्याच्या आजाराचा) धोका का असतो?

रेटीनोपैथी हा एक असा रोग आहे. ज्यामध्ये मधुमेहग्रस्त व्यक्तीच्या डोळयातील पडद्यावर परिणाम होतो. कारण त्याच्या रेटिनापर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. यासाठी आपण वेळेवर उपचार केले पाहिजे अन्यथा अंधत्व एक समस्या होऊ शकते. कोरोना इन्फेक्शननंतर हा धोका आणखीनच वाढला आहे कारण बहुतेक लोक व्हिटॅमिन डी अभावामुळे घराबाहेर पडू शकत नाही. ज्यामुळे रेटिनोपैथी होऊ शकते.

 डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय ?
-वाढलेल्या साखरेमुळे पडद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये बदल होऊ शकतात. 
-रक्तवाहिन्या बंद होणे, सूज येणे, रक्तवाहिन्यांची कमकुवत जाळी तयार होणे इत्यादी बदल दिसू शकतात. 
-वेळीच उपचार न केल्यास रक्तस्त्राव, पडदा सरकणे, पडद्याची सूज, काचबिंद यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.

कशामुळे हे दुष्परिणाम वाढतात ?
- साखर नियंत्रित नसणे.
-जास्त ब्लड 
-रक्तातील चरबीचे प्रमाण. 
-रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे. 
-दीर्घकालीन आजार, 
-तंबाखू, बीडीचे व्यसन. 
-मानसिक तण-तणाव. 
-अति मद्यपान इत्यादी मधुमेह व्यवस्थित नियंत्रित असतानाही हे दुष्परिणाम येऊ शकतात. पण ते बऱ्याचदा सौम्य स्वरुपाचे व औषधोपचाराने ठिक होणारे असतात.

कोरोना दरम्यान रेटिनोपैथीचा धोका कसा टाळायचा? 
रेटिनोपैथीचा धोका टाळण्यासाठी, वेळोवेळी डोळ्यांची स्क्रीन तपासणी करुन घ्या. जर तुम्हाला 5 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाचा त्रास होत असेल तर दर महिन्याला तुमची तपासणी केली पाहिजे. त्याशिवाय कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढवू देऊ नका आणि रक्तातील साखर आणि लिपिड प्रोफाइल तपासत रहा.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

loading image