सावधान : मूल ब्रेकफास्ट करत नाही? शिक्षणावर होतो परिणाम! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

न्याहरी अर्थात ब्रेकफास्ट हा तुमच्या आहारला सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. उत्तम न्याहरी तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करून देते. कारण या न्याहरीतून तुम्हाला ऊर्जा मिळाली तर, तुमचा पुढचा दिवस चांगला जाऊ शकतो.

न्याहरी अर्थात ब्रेकफास्ट हा तुमच्या आहारला सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. उत्तम न्याहरी तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करून देते. कारण या न्याहरीतून तुम्हाला ऊर्जा मिळाली तर, तुमचा पुढचा दिवस चांगला जाऊ शकतो. पण, अनेकदा घाई गडबडीत न्याहरी केली जात नाही. विशेषतः मुलांना सकाळची शाळा असले तर, अनेकदा गडबडीत तसेच पाठवले जाऊ शकते. पण, असे करणे त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. तुम्हाला तुमचे मूल अभ्यासात आघाडीवर असावे, असे वाटत असेल तर, त्यांना चांगला ब्रेकफास्ट देण्याची जबाबादारी तुमची असेल. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की, जे विद्यार्थी शाळेला येताना ब्रेकफास्ट करत नाहीत किंवा कमी करतात, त्यांचा शाळेतील परफॉर्मन्स कमी असल्याचं निदर्शनास आलंय. तुलनेत जे विद्यार्थी हेल्दी ब्रेकफास्ट करतात. त्यांचा चांगला शिक्षणातील परफॉर्मन्स चांगला असल्याचे दिसले आहे. त्यामुळं तुमचं मूल जर तुम्हाला शाळेत चांगला परफॉर्मन्स, करावं असं वाटत असले तर, तुम्ही त्याला रोज हेल्दी ब्रेकफास्ट देण्यास सुरुवात करा. 

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समध्ये या संदर्भात सविस्तर संशोधन झाले आहे. यात माध्यमिक शाळेतील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा अभ्यास करण्यात आला. वेस्ट यॉर्कशायरमधील 294 विद्यार्थ्यांचा सॅम्पल स्टडी यात करण्यात आला. यात 29 विद्यार्थी, ब्रेकफास्ट न करताच शाळेला येत असल्याचे निदर्शनास आले. तर, 18 टक्के विद्यार्थी कधी तरी ब्रेकफास्ट करतात आणि 53 टक्के विद्यार्थी रोज न चुकता ब्रेकफास्ट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विद्यार्थ्यांच्या सेमिस्टरमधील गुणांचा अभ्यास केल्यानंतर संशोधनातील निष्कर्ष काढण्यात आलाय. हे संशोधन फ्रंटियर्स इन पल्बिक हेल्थ या नियतकालिकात, प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

जर, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जर, सकाळचा ब्रेकफास्ट मिळाला नाही तर, त्यांच्या मेंदूला आवश्यक इंधन मिळत नाही. कमी पोषण हे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बाधा ठरू शकते. असा आमचा निष्कर्ष आहे.
- केटी अडोल्फस, संशोधक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child who skip breakfast performance poor in school