अंघोळ
अंघोळ bath

'या' पाच अवयवांची दररोज करा स्वच्छता, अनेक आजारांपासून मिळेल मुक्तता

कोरोनामुळे (corona) सर्वचजण वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, मास्क घालणे आणि इतरही गोष्टींकडे बारीक लक्ष देतो. यासोबतच शरीराचे काही अवयव (body parts to be clean) देखील स्वच्छ करणे गरजेचे आहे. शरीराचे पाच अवयव स्वच्छ केले नाही तर अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

अंघोळ
डिजिटल हेल्थ मिशन सुरु, PM मोदींनी केला शुभारंभ

नाभी -

बेली बटण किंवा नाभी हा शरीराचा सर्वात दुर्लक्षित भाग आहे. तथापि, जर ते नियमितपणे स्वच्छ केले नाही तर यामुळे घाण तयार होईल आणि जीवाणूंची वाढ होईल. नाभीसारखा खोलगट भाग हा जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो. त्यामुळे नाभी नेहमी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

बोटांच्या मधील जागा -

शरीराचा आणखी एक भाग जो सहसा दुर्लक्षित असतो तो म्हणजे बोटांच्या मधला भाग. त्यामध्ये घाण साचून राहिल्यास दुर्गंधी येऊ शकते. तसेच स्वच्छता न केल्यास जीवाणू तायर होऊ शकतात. त्यामुळे आपल्या बोटांच्या मधील जागा नियमितपणे धुवा आणि टॉवेलने कोरडी करा. तसेच, जर दुर्गंधी येत असेल तर टॅल्कम पावडर वापरा.

जीभ -

आपल्यापैकी अनेकांसाठी, मुख स्वच्छता केवळ दात आणि हिरड्या स्वच्छ करण्यापुरती मर्यादित आहे. तथापि, आपली जीभ स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. माऊथवॉश वापरले की झाले, असे अनेकांना वाटते. मात्र, हे योग्य नाही. आपल्या जीभेवर देखील जीवाणू असतात. त्यामुळे जीभ स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या श्वासालाच वास येत नाही तर दातांमध्ये किडे देखील तयार होऊ शकतात.

नखांच्या खाली -

जीवाणूला दूर ठेवण्यासाठी लोक साथीच्या काळात हात धुण्यावर जास्त भर देत आहेत. पण, तुम्ही हात योग्य पद्धतीने धूत आहात का? हे देखील महत्वाचे आहे. नखांच्या खालची जागा देखील स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण, जीवाणू आपल्या नखांच्या खाली जमा होऊ शकतात ज्यामुळे अतिसारसारख्या हानिकारक आजारास कारणीभूत ठरू शकते.

कानाच्या मागे -

कानाच्या मागची जागा स्वच्छ करणे गरजेचे आहे. याठिकाणी सेबेशियस ग्रंथी असतात. अनेकजण दररोज हा भाग स्वच्छ करत नाहीत. केस धुतांना कानाच्या मागील भाग स्वच्छ करतात. मात्र, असं चुकूनही करू नका. दररोज कानाच्या मागील बाजूस स्वच्छ करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com