कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे काय? 'या' किरकोळ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

या आजाराला “वेस्टर्न लाइफ डिझीज“ असंही म्हटलं जातं.
कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे काय? 'या' किरकोळ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

झपाट्याने होत असलेलं शहरीकरण आणि पाश्चात्य जीवनशैली या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अनेक जण सध्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जात आहेत. यामध्येच गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचं (सीआरसी) प्रमाण वाढत आहे. या आजाराला बरेचदा “वेस्टर्न लाइफ डिझीज“ अर्थात पाश्चात्य जीवनशैलीशी निगडित आजार असंही म्हटलं जातं. तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले मांस व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असलेल्या पदार्थांचा आहारात होणार अतिरेक, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही कोलन कॅन्सर अर्थात मोठ्या आतड्याचा कर्करोग जडण्याची काही सर्वसाधारण कारणे आहेत.

कोलन कॅन्सरचा भारतातील प्रादुर्भाव :

कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठे आतडे व गुदाशयाचा कर्करोग हा जगभरात सर्वाधिक प्रमाणात आढळणा-या कर्करोगांपैकी तिस-या क्रमांकाचा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये दरवर्षी दहा लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत असते. भारतामध्ये दरवर्षी कोलोरेक्टल कॅन्सरच्या ५०,हजार नव्या प्रकरणांचे निदान होते व हा आकडा वर्षाकाठी २० टक्के इतक्या भयावह वेगाने वाढत आहे. पुरुष व स्त्रियांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण हे दर १ लाख व्यक्तींमागे अनुक्रमे ४.४ व ३.९ टक्के इतके आहे. मुंबई क्षेत्राच्या कॅन्सर रजिस्ट्री आकडेवारीतून भारतामधील एकूण प्रादुर्भावाचे प्रमाणही दिसून येते. या आकडेवारीनुसार, कर्करोगाच्या विविध प्रकारांच्या यादीमध्ये या कर्करोगाचे स्थान पुरुष व स्त्रियांच्या बाबतीत अनुक्रमे १०वे आणि ८वे आहे.

कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे काय? 'या' किरकोळ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Coronavirus : 'या' चार गोष्टींना स्पर्श केल्यानंतर त्वरित धुवा हात!

कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे काय?

कोलन हा आपल्या पचनसंस्थेचा एक भाग आहे. अन्न पचनमार्गातून प्रवास करत असातना त्यातील पोषक घटक शोषले जातात. मोठे आतडे म्हणूनही ओळखल्या जाणारे कोलन शरीराकडून वापरल्या न गेलेल्या द्रवस्वरूपातील अन्नातील पाणी शोषून घेऊन त्याला घनस्वरूप देते व ते विष्ठेच्या रूपात शरीराकडून बाहेर फेकले जाते. सीआरसी या आजारामध्ये मोठे आतडे किंवा गुदाशयाच्या उतींमध्ये कर्कपेशी तयार होतात. आपल्या शरीरामध्ये जवळ-जवळ ३० ट्रिलियन पेशी या आपल्या गुणसूत्रांकडून मिळणा-या पूर्वनिर्धारित आदेशांनुसार वागत असतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, कर्कपेशींच्या वर्तणुकीत बिघाड झालेला असतो, त्या सर्व नियम मोडून टाकतात आणि वेगाने वाढतात, ही वाढ अनिर्बंध असते. अशा अनिर्बंध वाढलेल्या पेशी आपल्या शरीरातील या पेशींच्या जवळपासच्या यंत्रणांवर हल्ला चढवितात, आजार पुढच्या टप्प्यावर जातो तेव्हा अशा पेशी शरीरातील दूरवरच्या भागांमध्येही पसरू शकतात व तिथे नवा ट्यूमर निर्माण होऊ शकतो.

या आजाराची चिन्हे आणि लक्षणे कोणती?

सर्वसाधारणपणे ४५ वर्षांवरील वयोगटात हा आजार दिसून येतो. अशा व्यक्तींच्या पचनक्रियेमध्ये बदल झालेला आढळून येतो. अशा व्यक्तींच्या नेहमीच्या चाचण्यांमध्ये बद्धकोष्ठता किंवा अतिसार, शरीरावरील सूज आणि शौचातून रक्त किंवा आंव पडणे, कारणाशिवाय वजन घडणे, सहज थकवा येणे, पोटाच्या भागात वेदना किंवा सूज किंवा रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी घटणे अशा गोष्टी वारंवार दिसून येतात. कुटुंबात सीआरसीचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्तींनी वयाच्या अगदी विशीतही ही लक्षणे आढळू शकतात. सुमारे २० टक्के प्रकरणांमध्ये रुग्ण आजार पुढच्या टप्प्यावर पोहोचल्यावर मलावरोधाची तक्रार घेऊन पहिल्यांदा डॉक्टरकडे येतात व त्यांच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागते.

उशीरा निदान झाल्यामुळे कोणते धोके संभवतात?

पचनसंस्थेशी निगडित इतर कर्करोगांच्या तुलनेत सीआरसीचे अनुमान अधिक चांगल्या पद्धतीने काढता येते, तरीही कर्करोगावरील इलाजासाठी लवकरात लवकर निदान होणे आत्यंतिक महत्त्वाचे ठरते. या लक्षणांच्या महत्त्वाविषयी माहिती नसणे, डॉक्टरांची मदत घेण्यास उशीर होणे, आपल्या कुटुंबात असलेल्या कर्करोगाच्या पूर्वेतिहासाविषयी असलेले अज्ञान, दुर्गम, ग्रामीण भागातील रुग्णांना विशिष्ट निदानात्मक चाचण्यांसाठी आणि आरोग्यतज्ज्ञांची भेट घेण्यासाठी दूरवरचा प्रवास करावा लागणे ही सर्व आजाराच्या निदानास विलंब होण्यामागची कारणे आहेत. बहुतेकदा विष्ठेचा रंग बदलून तो लाल किंवा काळा पडण्यासारखे चिन्ह किंवा लक्षण दिसून येतात. अशावेळी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेतला जायला हवा. काही वेळी गुदद्वारातून रक्तस्त्राव होत असल्यास तो मूळव्याधीसारख्या सर्वसाधारण आजारामुळे होत असेल असे रुग्णाकडून गृहित धरले जाते आणि कर्करोग गंभीर टप्प्यावर पोहोचेपर्यंत कुडमुड्या वैद्यांकडून उपचार सुरू ठेवले जातात. सीआरसी हा एक स्वतंत्र आजार म्हणून आणि काही इतर आजारांचा भाग म्हणून (कॅन्सर सिंड्रोम्स) कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेला असू शकतो. आपल्या नात्यातील कोणाला, कितव्या वर्षी हा आजार झाला होता, अशा व्यक्तीशी आपले नेमके काय नाते आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे धोक्याचे वर्गीकरण करण्यास मदत होते व सीआरसीसाठीचे स्क्रिनिंग करण्याची शिफारस करता येते.

लवकर निदान होण्यासाठी लवकरात लवकर स्क्रिनिंग व्हायला हवे :

स्क्रिनिंगच्या अनेक पद्धतींपैकी सर्वात महत्त्वाची पद्धती म्हणजे साधारण धोका असलेल्या लोकसंख्येतील व्यक्तींसाठी वयाच्या किमान ४५व्या वर्षी कोलोनोस्कोपीची शिफारस करणे. कुटुंबात सीआरसीचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्ती किंवा वर सांगितलेली चिन्हे /लक्षणे दिसणा-या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून लवकरात लवकर कोलोनोस्कोपी करून घेतली पाहिजे. रुग्णाचे वय, कुटुंबाचा पूर्वेतिहास आणि पहिल्या कोलोनोस्कोपीतून हाती आलेले निष्कर्ष यानुसार अशा चाचणीही वारंवारता ठरवली जाईल.

( डॉ. राहुलकुमार चव्हाण वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कन्सल्टन्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com