esakal | Coronavirus : 'या' चार गोष्टींना स्पर्श केल्यानंतर त्वरित धुवा हात!

बोलून बातमी शोधा

handwash

Coronavirus : 'या' चार गोष्टींना स्पर्श केल्यानंतर त्वरित धुवा हात!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने पुन्हा जोर धरला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. सध्या प्रत्येक जण घरात अडकून पडला आहे. परंतु, घरात असतांनादेखील प्रत्येकाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडतांना मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. यामध्येच कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता बाळगणंदेखील तितकंच आवश्यक आहे. परंतु, अशा काही गोष्टी आहेत, ज्यांना स्पर्श केल्यानंतर हात धुणे अत्यंत गरजेचं आहे.

१. कोणतीही फळं किंवा भाज्या शिजवण्यापूर्वी किंवा चिरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. तसंच भाज्या व फळेदेखील व्यवस्थित धुवून घ्या.

२. जेवणापूर्वी हात धुवा.

३. एखाद्या रुग्णाची सेवासुश्रुषा करत असाल तर वारंवार हात धुणं आवश्यक आहे.

४. जखमेवर उपचार करण्यापूर्वी हात धुवा.

५. कॉन्टेक्ट लेन्स लावण्यापूर्वी किंवा काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

हेही वाचा: Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन

या गोष्टींना स्पर्श करण्यापूर्वी हात धुणे गरजेचं

१. स्वयंपाकाची पूर्वतयारी झाल्यावर.

२. कोणत्याही प्राण्यांना किंवा त्यांच्या खाद्यपदार्थांना स्पर्श केल्यावर.

३. शौचालयाचा वापर केल्यावर किंवा लहान मुलांचे डायपर चेंज केल्यावर.

४. शिंका आल्यावर किंवा खोकल्यावर.