कोरोना आणि होमिओपॅथी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

चीनमधील कोरोना साथीच्या चर्चेनंतर होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का अशी विचारणा होऊ लागली. होमिओपॅथीत अशा साथींबाबत योग्य अशी उपचार पद्धती आहे. प्रामुख्याने त्याचे स्वरूप प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहे

चीनमधील कोरोना साथीच्या चर्चेनंतर होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का अशी विचारणा होऊ लागली. होमिओपॅथीत अशा साथींबाबत योग्य अशी उपचार पद्धती आहे. प्रामुख्याने त्याचे स्वरूप प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहे. 

19 व्या शतकामध्ये मेंदुज्वरची साथ जेव्हा आंध्रपदेशात पसरली होती. त्यावेळी आंध्रप्रदेश सरकारने फक्त होमिओपॅथी औषधांवर पूर्ण राज्यातील मेंदुज्वरची साथ आटोक्‍यात आणली होती. अशक्‍यप्राय वाटणारी मेंदुज्वराची साथ काही होमिओपॅथी औषधांमुळे रोखण्यात वरदान ठरली होती. आताही त्याचा विचार करायला हरकत नाही.

सेंट्रल कौन्सिल रिसर्च इन होमिओपॅथीमधील काही मार्गदर्शक तत्त्वे आणि ऍक्‍युट रेस्पिरेटरी सिकनेस काही औषधे परिणामकारक काम करू शकतील असे मला वाटते. अर्सेनिक ऍल्ब आणि जलसेमियम अशी औषधे आहेत. मात्र रुग्णाच्या लक्षणांच्या गंभीरतेनुसार यांचा वापर करावा. तरच ती योग्य प्रकारे लागू पडतील. कोरोना प्रमाणेच एपिडेमिक, एंडेमिक साथींमध्ये होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक औषधे सुमारे शंभर ते एक हजार रुग्ण पाहून त्यांची सामान्य एकत्रित लक्षणे पाहून काही औषधे काढली जातात.

ही औषधे त्या शंभर रुग्णांवर उपयोगी पडल्यानंतर त्या औषधांना जेनस एपिडेमिकस असे नाव दिले जाते व ती औषधे त्या प्रदेशातील सर्व लोकांना प्रतिबंधात्मक म्हणून लागू पडू शकतात. अशा प्रकारे होमिओपॅथीने जीवघेणी साथ आटोक्‍यात येऊ शकते. 
कोरोना या व्हायरल सिकनेस अगदी सामान्य सर्दी, खोकला, ताप प्रमाणे प्राथमिक स्वरूपाच दिसतो. पण डोकेदुखी, उलट्या, न थांबणारा ताप आणि श्‍वसनाला होणारा त्रास ही लक्षणे आढळल्यास त्वरित योग्य उपचाराने तो बरा होऊ शकतो. न घाबरता आणि स्वत:च स्वत:चे डॉक्‍टर न बनता रुग्णांनी योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

काळजी कोणती घ्याल? 

  • हातांची स्वच्छता. हात साबणाने स्वच्छ धुणे * सहा ते सात तासांची रात्रीची झोप महत्त्वाची 
  • योग्य वेळी योग्य आहार घेणे * शिंकताना, खोकताना रुमाल वापरणे किंवा तोंडासमोर हात ठेवणे 
  • अति गर्दीची ठिकाणे टाळणे किंवा वरील दखल घेऊनच जाणे * लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला व उपचार घेणे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona and homeopathy