कोरोना रुग्णांमध्ये आढळली vitamin D ची कमतरता; 5 पदार्थांचे करा सेवन

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

युरोपासह अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.

पुणे: सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. युरोपासह अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं तज्ज्ञांनी सांगितले आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव जरी कमी होत असला तरी धोका पुर्णपणे टळला नाही. तसेच कोरोनावर अजून लसही आली नसल्यामुळे वाढते कोरोना रुग्ण कसे थांबवायचे हा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. 

काही दिवसांपुर्वीच झालेल्या इंडोक्राईन सोसायटी जर्नल ऑफ क्लिनिकल इंडोक्रिनोलॉजी ऍंड मेटॅबॉलिझम (Endocrine Society's Journal of Clinical Endocrinology & Metabolism) यांच्या अभ्यासानुसार, स्पेनमधील 200 हॉस्पिटलमधील 80 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांमध्ये vitamin D ची कमतरता जाणवली. या रुग्णांमध्ये vitamin D चे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. 

हिवाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळांचे सेवन कराच

vitamin D चे कमी प्रमाण धोकादायक-
तज्ज्ञांच्या मते, शरीरात vitamin D चे प्रमाण कमी असलेल्या लोकांना विवध आजारांना आणि रोगाला सामोरं जावं लागतो. vitamin D मुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहते, त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता चांगली राहते. जर याचेच प्रमाण कमी असेल तर त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. 

यासाठी अपण शरीरातील vitamin D कसं वाढेल यावर भर दिला पाहिजे आणि त्याप्रकारच्या पदार्थांचे सेवन केलं पाहिजे. आपल्या शरीराला vitamin D सकाळच्या प्रहरातील कोवळ्या सुर्यप्रकाशापासून मिळते. तसेच अनेक पदार्थाच्या सेवनातून vitamin D चे प्रमाणही वाढते.

हिवाळ्यातील आहारात करा स्निग्धपदार्थ, बियायुक्त भाज्यांचा समावेश

कशातून भेटेल vitamin D-
सूर्याच्या प्रकाशात 280 ते 320 नॅनोमीटर लांबीच्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेवरील पेशींमध्ये असलेल्या डी-हायड्रोकोलेस्टेरॉलचे रूपांतर व्हिटॅमिन ‘D ३’(कोलेकॅल्सिफेरॉल)मध्ये होते. तेव्हा 10-15 मिनिटे सूर्यस्नान घेणे उपयुक्त आहे. आपण आहारात दूध, चीज, संत्री, अनेक प्रकारची धान्ये, ओट, मशरुम्स, अंडी यांचा समावेश केला पाहिजे. त्यात vitamin Dचं प्रमाण चांगलं आहे. म्हणूनच ‘कोरोना’च्या संकट काळात विषाणूचा बीमोड करण्यासाठी शरीरातील vitamin D वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona cases looks positive due to Vitamin D Deficiency