esakal | लस घेतल्यानंतर म्युकोरमायकोसिसचा धोका होतो कमी?
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

लस घेतल्यानंतर म्युकोरमायकोसिसचा धोका होतो कमी?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक जण कोरोना विषाणूसोबत लढा देत आहे. विशेष म्हणजे या विषाणूवर यशस्वीरित्या मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये पोस्ट कोविडची समस्या निर्माण होत आहे. यामध्येच म्युकोरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचं पाहायला मिळालं. म्हणूनच, कोविड आणि पोस्ट कोविडची समस्या टाळायची असेल तर लवकरात लवकर प्रत्येकाने लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांनी कोविडची लस घेतली आहे त्यांच्यामध्ये म्युकोरमायकोसिस होण्याचा धोका कमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स पॅनलने अलिकडेच एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांनी हे मत मांडलं आहे. (corona-vaccine-vaccination-reduces-mucormycosis-risk)

अलिकडेच कोविडसंदर्भात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये देशातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी लसीकरणाचं महत्त्व आणि कोविडची समस्या टाळण्याचे उपाय यावर चर्चा केली.

"मार्च महिन्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीच्या काळात म्युकोरमायकोसिसचे २ ते ३ रुग्ण होते. त्यानंतर त्यांच्यात वाढ होऊन हा आकडा १० ते १५ पर्यंत पोहोचला. इतकंच नाही तर म्युकोरमायकोसिसमुळे जवळपास ४० ते ५० टक्के लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. विशेष म्हणजे काळ्या बुरशीवर ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढली", असं चेन्नईमधील मद्रास ईएनटी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक, ओटोऱ्हायनोलॅरिंगोलॉजिस्ट प्राध्यापक डॉ. मोहन कामेश्वरन यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "माझ्याकडे आलेल्या रुग्णांपैकी जवळपास ६० ते ७० रुग्णांनी कोविड लस घेतली नव्हती. तर ३० टक्के लोकांनी लशीचा एक डोस घेतलेला आणि ५ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. विशेष म्हणजे ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यात कोरोना होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. परिणामी, अशा व्यक्तींना म्युकोरमायकोसिसचा धोकाही नाही."

दरम्यान, हळूहळू आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, कोविडवर मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये आता पोस्ट कोविडची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

loading image