esakal | तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका; जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

child corona

तिसऱ्या लाटेवर नियंत्रणासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला सल्ला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुले जोखमीच्या गटात राहतील, असे भाकीत तज्ज्ञांनी मांडले आहे. यामुळे लहान मुलांना कोरोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. पालकांनी लहान मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवावा. मुलं घरी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सारखं रागावून चालणार नाही. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची मुलांना सवय लावा. सार्वजनिक कार्यक्रमात मुलांना घेऊन जाऊ नका. दोन वर्षांच्या वरच्या वयोगटातील मुलांनी मास्क वापरावे. सॅनिटायझरचा व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा, असे नवजात शिशूरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण खापेकर म्हणाले.

दर दिवसाला कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आले. तिसऱ्या लाटेत कोणताही जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये यासाठी मास्क वापरण्यापासून तर सॅनिटायझर व गर्दीची ठिकाणे टाळणे हे खबरदारीचे उपाय सुरू ठेवण्याची खरी गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

हेही वाचा: मुलांमधील हट्टीपणा असा करा कमी

निष्काळजीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवणे आवाक्याबाहेर झाले. यामुळेच मोठ्या प्रमाणात जीवहानी झाली. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना हातपाय पसरत आहे. त्यात लहान मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे ही लाट मुलांसाठी घातक ठरू शकते. परराज्यातून तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे. शहरात येणाऱ्यांचे वाढते लोंढे कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

नियंत्रणासाठी उपाययोजना

  • इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची सीमेवर व्हावी तपासणी

  • महापालिकेने शक्य झाल्यास घरोघरी सर्वेक्षण करावे

  • औषध दुकानदारांकडून पॅरासिटेमाल, कफ सिरफ औषधे खरेदी करणाऱ्यांची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचावी

हेही वाचा: लोकांना जोडत कामे केल्याने गवसला मार्ग; सुनीलची वेगळी वाट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाईच अनुभव जवळपास प्रत्येकाला आला आहे. प्रचंड जीवहानी झाली. कोरोना तिसऱ्या लाटेचे संकट थोपवण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावाच लागले. मात्र, विविध जिल्ह्यातून नागरिकांचे येणे जाणे सुरू असेल त्यांची सीमेवर तपासणी करावी. नोव्हेंबरपर्यंत उद्याने बंद ठेवावी. काही वेळापुरते मॉल सुरू ठेवावे. सण उत्सवांवर नियंत्रण आणावे. उत्सव पुढेही साजरे करता येतील. जीव पुन्हा येणार नाही. निर्बंध घातले तर कोरोना वर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.
- डॉ. पवन शहाणे, प्लॅस्टिक व कॉस्मॅटिक सर्जन, नागपूर
लहान मुलांना कोरोनाची लागण होणार नाही याची खबरदारी पालकांना घ्यायची आहे. यामुळे पालकांनी स्वतःची खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोरोना घरात शिरणार नाही. मुलांना सर्दी, खोकला, ताप, उलटी, पोटदुखी, पोट बिघडण, डोकेदुखी आदी लक्षणे आढळून येतात. अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरू नये. त्वरित बालरोग तज्ज्ञांशी संपर्क साधावा. कोरोनाची तपासणी करावी. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी बोलावले तरच क्लिनीकमध्ये जावे. अन्यथा डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटिंग करा.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल
loading image
go to top