esakal | कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते?
sakal

बोलून बातमी शोधा

immunity

कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘इम्युनिटी’ म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते?

sakal_logo
By
शौमा मेनन

कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘इम्युनिटी’ म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेला शब्दही आहे! हे अगदीच सहाजिक आहे, कारण या काळात आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत चांगलेच घाबरून आहोत... आपल्या या भीतीला बाजारपेठेचे स्वरूप देण्यासाठी बाजारात अनेक पदार्थ रांग लावून उभे आहेत. यातील कोणते पदार्थ आपल्या किती कामाचे आहेत, ते पाहूयात.

इम्युनिटी टी : ही सर्वांत मोठी फसवणूक म्हणता येईल. एखादा चहा जर तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देत असेल, तर तुम्ही तुमचा सर्व आहार सोडून फक्त चहाच पीत बसायला काहीच हरकत नाही!

इम्युनिटी बिस्किटे : मैदा आणि त्यात अश्वगंधा एकत्र करून तयार केलेली बिस्किटे तुम्हाला कधीच रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणार नाहीत, यावर विश्वास ठेवा. आणि त्यातून थोडीफार रोगप्रतिकारशक्ती मिळाल्यास तुमचे वजन नक्की वाढणार, हेही लक्षात ठेवा. या बिस्किटांमुळे तुम्ही अनफिट बनाल आणि अशा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कधीही चांगली नसते.

हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम

इम्युनिटी आटा : ही सर्वांत मोठी फसवणूक ठरावी. असा काही पदार्थ असूच शकत नाही.

इम्युनिटी शेक्स, स्मुदिज, शॉट्स, चिप्स... : अशा पदार्थांचीही यादी खूप मोठी आहे. पदार्थांच्या पाकिटावर लिहिलेल्या इम्युनिटीचा दावा करणाऱ्या वाक्यांना भुलू नका. स्वतःला संकटात लोटणाऱ्या आणि खिशावर डल्ला मारणाऱ्या या जाहिरातींपासून कृपया दूर राहा. पदार्थात असलेल्या सर्व घटकांची माहिती घेण्यासाठी थोडा वेळ द्या. त्यातील मैद्याचे प्रमाण ०.१ टक्के आणि स्पिरुलिना ०.०१ टक्के या माहिती व्यतिरिक्त दिलेल्या पदार्थांची यादीही तपासून पाहा.

हे वाचा - ज्येष्ठ नागरिकांनाे! व्यायामाच्या माध्यमातून करा सांधेदुखीचे व्यवस्थापन

मग खरी इम्युनिटी मिळते कोठून?

  • एक समतोल जीवनशैली. योग्य पदार्थांचे सेवन व दिवसभर भरपूर हालचाली, व्यायाम करणे.
  • दिवसभर किमान १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाशात वावरणे.
  • दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी पिणे. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतील आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होईल.
  • स्वतःला वेळ द्या. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या शरीराचे पाहणी करा. त्यासाठी वेळ दिल्यास तुमच्या शरीराला नक्की कशाची गरज आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल.
  • तुमच्या शरीराचे ऐका...ते कधीही खोटे सांगत नाही...
loading image