महत्त्वाची बातमी - गायनेकोमास्टियावर उपचार शक्य

डॉ. प्रितीश श्रीकांत भावसार, डोंबिवली, प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन
शुक्रवार, 29 मे 2020

पुरुषांना नेहमीच स्नायूंची (Muscular) छाती हवी असते. परंतु जर छातीचा भाग स्त्रियांसारखा दिसू लागला, चरबी जमा करू लागला आणि फुगू लागला तर ते त्यांच्यासाठी दुस्वप्न ठरते.

मुंबई - पुरुषांना नेहमीच स्नायूंची (Muscular) छाती हवी असते. परंतु जर छातीचा भाग स्त्रियांसारखा दिसू लागला, चरबी जमा करू लागला आणि फुगू लागला तर ते त्यांच्यासाठी दुस्वप्न ठरते. लाजिरवाणे वाटू नये म्हणून एखादी व्यक्ती सैल फिटिंग शर्ट घालू शकते. कोणासोबत न चालता अशा व्यक्ती नेहमीच पुढे चालत असतात. भयानक तणावातून या व्यक्ती जातात, त्यातून त्यांचा मानसिक त्रास देखील वाढतो.

लिपोसक्शन (Liposuction) आणि उत्सर्जन (Gland excision) करून जादा चरबी आणि स्त्री ग्रंथीच्या उती पूर्णपणे काढून शस्त्रक्रियेद्वारे गायनेकोमास्टिया (Gynecomastia) सहजपणे व्यवस्थित करता येते.

बहुतेक मुलांच्या तारुण्याच्या वयातच, त्यांच्या छातीवर काही विशिष्ट बदल होतो आणि जो स्त्रियांसारखा दिसतो. परंतु काही वर्षांत हे लक्षण कमी होते. हे या काळात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे होते. परंतु काही लोकांमध्ये ही स्थिती नंतरच्या वयात तशीच राहते. परिणामी स्तनाचे क्षेत्र फुगणे सुरू होते आणि स्तनाग्र भागात वाढ होते. या बदलामुळे त्या व्यक्तीला घट्ट फिटिंगचे कपडे किंवा टी-शर्ट्स घालणे अशक्य होते.

कोरोनातून बरे झालेले जितेंद्र आव्हाड स्वतः सांगतायत, कोरोना, राजकारण आणि बरंच काही...

बहुतेक प्रकरणांमध्ये ही परिस्थिती छातीच्या व्यायामाने बदलली जाऊ शकते आणि चरबी नष्ट होऊ शकते. परंतु काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.

एक कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जन लिपोसक्शन नावाच्या पद्धतीने जास्तीत-जास्त अनावश्यक चरबी आणि ग्रंथी बाहेर काढू शकतो. स्तनाखालील भागात असलेल्या पटांमध्ये (folds) लहान चिरे (incision ) करुन ही शस्त्रक्रिया केली जाते. स्थानिक भूल देऊन ही शस्त्रक्रिया साधारणत: 1 ते 2 तासात पूर्ण होते. काही तासांच्या निरीक्षणानंतर ती व्यक्ती त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकते.

कोरोनासंदर्भातील 'हे' आहेत मुंबईतील सर्वात खतरनाक वॉर्ड्स, डेंजर झोन्स...

लवकरच त्या व्यक्तीस आरामदायक वाटते, तरीही काही प्रकरणांमध्ये काही फॉलोअप्स करणे आवश्यक आहे. त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा आपला आवडता फिटिंग शर्ट आणि टी-शर्ट घालू आनंदाने शकते.

cure on gynecomastia is in mumbai read important news
 
 
 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cure on gynecomastia is in mumbai read important news