esakal | Daily योग: जाणून घ्या, दंडासनाचे फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

dandasan

Daily योग: जाणून घ्या, दंडासनाचे फायदे

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दंडासन केवळ शारीरिक समस्यांपासून मुक्त करत नाही, तर एकाग्रता वाढवते आणि श्वसनही सुधारते.

दंडासन कसे करावे?

चटई किंवा योग मॅट घेऊन त्यावर पोटावर झोपा. दोन्ही हात छातीजवळ नेऊन खांदे वर घ्या. आता हातावर वजन टाकून वर उठा आणि पायांच्या बोटांना जमिनीला टेकवून अंग जमिनीपासून वर घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही अशा अवस्थेत आहात की जमिन आणि शरीरामध्ये ९० अंशाचा कोन बनेल. यामध्ये हातावर आणि खांद्यांवर सर्व भार न देता पोटाचे स्नायू आवळून गुरुत्वाकर्षणाविरुध्द शरीर वर उचलून ठेवा. डोकं शरीराप्रमाणे सरळ ठेवून समोर बघा. या स्थितीत किमान १० सेकंदांपर्यंत किंवा तुमच्या क्षमतेनुसार राहा.

हेही वाचा: Daily योग : ध्यान का केलं जातं?; जाणून घ्या फायदे

दंडासनाचे फायदे कोणते?

- हे आसन केल्यास दंड, मांड्या, खांदे आणि मनगट मजबूत होतात.

- ओटीपोटातील स्नायू बळकट होतात.

- ओटीपोट आणि मांड्यांतील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.

- कमरेचे स्नायू बळकट होतात.

- शरीराची ठेवण उत्तम होण्यास मदत होते.

loading image
go to top