esakal | Daily योग: जाणून घ्या पवनमुक्तासन करण्याचे फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

pawanmuktasan

Daily योग: जाणून घ्या पवनमुक्तासन करण्याचे फायदे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सध्या अनेक क्षेत्रं अनलॉक होत असली तरी बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम करताना कामाचे तासही वाढले आहेत आणि कामादरम्यान पुरेसा ब्रेकही घेता येत नाही. त्यामुळे अनेकांना मणक्याच्या, मानेच्या आणि पाठीच्या दुखण्यानं ग्रासलं आहे. तासंतास एकाच जागी चुकीच्या पद्धतीने बसणं, ब्रेक न घेता काम करणं, हालचालींचा किंवा व्यायामाचा अभाव यांमुळे हा त्रास अधिक वाढतो. अशावेळी काही योगासने ही अत्यंत फायदेशीर ठरतात. पवनमुक्तासन हे त्यापैकीच एक आसन आहे.

पवनमुक्तासन कसे करावे?

प्रथम शवासनाच्या स्थितीत या. त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू गुडघ्यात दुमडून छातीजवळ आणा. दोन्ही हातांनी गुडघे धरा. या स्थितीत मान सरळ ठेवा. हे आसन प्रथम एका पायाने, नंतर दुसऱ्या पायाने आणि शेवटी दोन्ही पायांनी एकत्र केला जाऊ शकतो.

हेही वाचा: Daily योग: पादांगुष्ठासनाचे फायदे कोणते?

पवनमुक्तासन करण्याचे फायदे-

- कमरेचे स्नायू ताणले जातात.

- ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात आणि पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.

- पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

- पाठीचा कणा बळकट होतो.

loading image