esakal | Daily योग: पाठदुखीने त्रस्त असाल तर नियमित करा शशांकासन
sakal

बोलून बातमी शोधा

Daily योग: पाठदुखीने त्रस्त असाल तर नियमित करा शशांकासन

Daily योग: पाठदुखीने त्रस्त असाल तर नियमित करा शशांकासन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सध्याच्या काळात प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करत आहे. त्यामुळे एकाच जागी बराच वेळ बसून काम केल्यामुळे अनेक जणांमध्ये पाठदुखी, मानदुखी वा कंबरदुखीची समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच या समस्येपासून सुटका करण्यासाठी शशांकासन हे आसन अत्यंत फायदेशीर ठरतं. (daily-yog-shashankasana-health-benefits-for-back)

कसं करावं शशांकासन?

प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही हात वर करावेत आणि शरीराचा वरील भाग अलगदपणे जमिनीच्या दिशेने खाली आणण्याचा प्रयत्न करावा. यावेळी शक्य होत असल्यास डोकं जमिनीला टेकवावं आणि हातांचादेखील जमिनीला स्पर्श करावा. यावेळी पाठीला जितका स्ट्रेच देता येईल तितका स्ट्रेच द्यावा. या स्थितीत डोळे बंद करावे व काही सेकंद या स्थितीत राहावे. ३-४ मिनीटे या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.

शशांकासनाचे फायदे -

१. पाठदुखीची समस्या दूर होते.

२. पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत मिळते.

३. पोटाशी निगडीत समस्या दूर होतात.

४. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

५. बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.

६. पाठीच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळतो

७. या आसनाने स्मरणशक्ती देखील वाढते

loading image