esakal | Daily योग: अधो मुखश्वानासनाचे फायदे कोणते?
sakal

बोलून बातमी शोधा

adho mukhshwanasan

Daily योग: अधो मुखश्वानासनाचे फायदे कोणते?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अधो मुखश्वानासन हे अत्यंत सहजसोपं असून कोणीही ते करू शकतं. यासाठी सर्वात आधी सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. नंतर हळूहळू खाली वाका आणि शरीराचा आकार उलट्या 'V' प्रमाणे होईल अशाप्रकारे हात आणि पायांमध्ये अंतर ठेवा. यावेळी हात आणि पाय ताठ राहतील याची काळजी घ्या. दोन्ही पाय थोडे जवळ घ्या आणि दोन्ही हातांमध्ये पुरेसे अंतर ठेवा. या स्थितीत काही वेळ थांबा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या. थोड्या वेळाने हीच क्रिया पुन्हा करा.

अधो मुखश्वानासन करण्याचे फायदे-

- या आसनाने स्नायू मजबूत होतात.

- शरीराला चांगला ताण मिळतो.

- शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.

- पाठीच्या कणाची लवचिकता वाढते.

- छातीच्या स्नायूंना बळकटी येते आणि फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते.

- मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होतो.

- डोकेदुखी, झोपेची समस्या आणि थकवा दूर करते.

loading image