डार्क सर्कल्‍समुळे हैरान झालात? हे घरगुती उपाय कराच...

dark circles.jpg
dark circles.jpg
Summary

डार्क सर्कल्‍स केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच कमी करत नाहीत, तर व्यक्ती त्याच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही डार्क सर्कल्‍स सहज घालवू शकता.

पुणे: तुमचे डोळे कितीही सुंदर असतील, पण जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्‍स आले असतील तर तुमचे सुंदर डोळे सुद्धा त्यांची जादू दाखवू शकणार नाहीत. डोळ्यांखाली डार्क सर्कल्‍स असावीत असे कोणालाच वाटत नाही. असे होणे हे एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नाही, कारण त्यांच्यापासून लांब राहणे कठीण वाटते. डार्क सर्कल असण्याची अनेक कारणे आहेत जसे पोषक तत्वांचा अभाव, सतत संगणकासमोर बसणे, झोपेचा अभाव, जास्त ताण आणि रोग. डार्क सर्कल्‍स केवळ चेहऱ्याचे सौंदर्य कमी करत नाहीत, तर व्यक्तीला त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही डार्क सर्कल्‍स सहज घालवू शकता.

dark circles.jpg
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे? करा या घरगुती उपायांचा वापर

- काकडी आणि पुदिन्याची पाने बारीक करून डोळ्यांजवळील डार्क सर्कल्‍सवर लावा, हळूहळू ते कमी होऊ लागतील.

- बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, नंतर ते बारीक करा आणि त्यात लिंबाचा रस मिसळा, त्या जागेवर लावा, यामुळे डार्क सर्कल्‍स कमी होतात.

- टोमॅटो प्युरी बनवा, थोडे बेसन आणि लिंबाचा रस घाला आणि डोळ्यांखाली लावा, हळूहळू रिझल्ट दिसून येईल.

- कच्चे बटाटे बारीक करा, नंतर ही पेस्ट डोळ्यांखालील डार्क सर्कल्‍सवर लावा, हा डार्क सर्कलसाठी देखील एक उत्तम उपाय आहे.

- काकडीचा एक तुकडा घ्या आणि डार्क सर्कल्‍सवर लावा. डार्क सर्कल काढण्याचा हा रामबाण आणि सोपा मार्ग आहे.

- डाळिंबाच्या सालीची पेस्ट बनवून डार्क सर्कलवर लावा, एक उत्तम उपाय.

- काकडीचा रस बाहेर काढा, नंतर गुलाब पाणी समान प्रमाणात मिसळा आणि डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डार्क सर्कल निघू लागतील.

- दररोज झोपण्यापूर्वी, कापसामध्ये दूध भिजवून डोळ्यांवर ठेवा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर काढा.

- रोज तुम्ही स्वच्छ पाण्यात गुलाबाच्या पाण्याचे थेंब मिसळून डोळे धुवा, हा उपाय एकदम प्रभावी आहे.

- डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या भागावर कच्चा बटाटा लावा. डार्क सर्कल कमी होऊ लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com