चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे? करा या घरगुती उपायांचा वापर

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे? करा या घरगुती उपायांचा वापर

नागपूर : चेहरा हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. स्त्रिया आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी विशेष प्रयत्न करीत असतात. महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर आणि डागविरहित हवा असतो. बाजारामध्ये कित्येक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट उपलब्ध आहेत. जे सौंदर्य खुलवण्याचा दावा करतात. परंतु, केमिकलयुक्त अशा प्रोडक्टमुळे त्वचेला नुकसान चान्स अधिक असते.

महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्चा वापर करीत असतात. यामध्ये चेहऱ्याच्या विविध क्रीमचा देखील समावेश असतो. सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला ब्यूटी पार्लरमध्येही जातात. परंतु, घरच्याघरी देखील सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक वस्तूंचा वापर करता येऊ शकतो. काही घरगुती पद्धतीने तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये न जाता सौंदर्य वाढवू शकता. प्राचीन काळापासून चालत असलेल्या या वस्तूंच्या आणि पद्धतींच्या मदतीने घरच्याघरी सुंदर दिसू शकता.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे? करा या घरगुती उपायांचा वापर
वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दागिन्यांसह रोख लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी केसर फायदेशीर आहे. दुधामध्ये केसर टाकून वापरल्यास खूप फायदा होतो. चेहऱ्यावरील टॅन दूर करण्यासाठी दूध, चंदन आणि केसर एकत्र लावणे फायदेशीर ठरते. पपईमध्ये मध आणि केसर एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होते. याचबरोबर ढिल्या झालेल्या त्वचेसाठी केसर लिंबू, मध आणि बदाम एकत्र करून लावावे.

हळद तर आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे आणि ती सौंदर्य शास्त्राचा सुद्धा अविभाज्य भाग आहे. औषधापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत प्रत्येक गोष्टीत हळद लाभदायक ठरते. म्हणूनच हळदीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. पूर्वी लोक चेहऱ्याच्या विविध समस्या ठीक करण्यासाठी हळदीचा प्रयोग करायचे. डोळ्यांखालील काळे घेरे सुद्धा हळदीच्या मदतीने दूर केले जायचे. याशिवाय चंदन, दूध, मलाई आणि मध एकत्र करून या मिश्रणाचा वापर फेसपॅकच्या रूपात केला जायचा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो वाढायचा.

देव पूजेच्या कार्यात सर्वांत महत्त्वपूर्ण असणारे आणि बाजारात ज्याला अधिक किंमत आहे असे चंदन सुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याचा वापर दूध आणि हळद यांच्यासह केला जातो आणि फार पूर्वीपासून हा उपाय वापरला जातो. चंदनाचा लेपचा वापर नॅच्युरल सेंटच्या रूपात सुद्धा केला जातो. याशिवाय चंदन चेहऱ्यावरील मुरुमांवर लावण्याची परंपरा सुद्धा जुनी आहे. कारण, यामुळे लगेच आराम मिळतो असे म्हणतात. चेहऱ्यावर आणि हातावर चंदनाचा लेप नियमित लावल्याने कुलिंग इफेक्ट निर्माण होतो.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे? करा या घरगुती उपायांचा वापर
घासलेटच्या दिव्याखाली अभ्यास करून पोहोचला प्राचार्य पदावर

मोहरीचा वापर सौंदर्य उपाय म्हणून केला जातो हे फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत ज्यामध्ये मोहरीचा वापर केला असतो. मोहरी पावडर आणि मोहरीचे तेल दोन्ही स्कीनसाठी चांगले मानले जाते. ते उटण्याच्या रूपात पूर्वीपासून वापरले जात आहे. एवढेच नाही तर यापासून तयार होणाऱ्या उटण्याने मालीश केल्याने टॅनिंग दूर होते आणि हे वॅक्सिंगसाठी सुद्धा वापरले जाते. स्कीनचा ग्लो वाढवण्याच्या कामात मोहरीचा जास्त वापर होतो असे जाणकार सांगतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com