
रक्तात तीन प्रकारच्या पेशी असतात. यामध्ये लाल, पांढऱ्या आणि प्लेटलेट्सचा समावेश असतो.
रक्तामध्ये लाल रक्त पेशींच्या वाढीमुळे पॉलीसिथेमियाचा आजार होतो. तर लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा त्रासही होतो. यासोबतच थकवा, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, त्वचा पिवळी होणे आणि घाबरल्यासारखं वाटणं या तक्रारीही होतात. यासाठी रक्तामध्ये लाल रक्त पेशींचे संतुलन असणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल असतो.
रक्तात तीन प्रकारच्या पेशी असतात. यामध्ये लाल, पांढऱ्या आणि प्लेटलेट्सचा समावेश असतो. तज्ज्ञांच्या मते RBC चे प्रमाण कमी जास्त होण्याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडते. यामध्ये थोडंस दुर्लक्ष करणंही धोकादायक असतं. जर तुम्हालाही लाल रक्त पेशी कमी असण्याची समस्या असेल तर तुमच्या डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करा. यामुळे RBC मध्ये वाढ होईल.
आयर्न रिच फूड्स
RBC च्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा धोका वाढतो. यासाठी खाण्यामध्ये आयर्न रिच फूड्सचा समावेश करा. यात रेड मीट, शेंगा, अंडी, बीन्स, सुका मेवा हे पदार्थ येतात. या पोषक तत्वांमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल. लाल रक्त पेशींमध्ये आढळणाऱ्या प्रोटीनमुळे RBC वाढण्यासाठी मदत होते.
थंडीच्या दिवसात मेथी खाण्याचे 5 फायदे घ्या जाणून; आहारात नक्की कराल समावेश
फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थ
लाल रक्त पेशी आणि पांढऱ्या पेशी तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बीची आवश्यकता असते. फोलेट म्हणजेच फॉलिक अॅसिड युक्त पदार्थांमधून व्हिटॅमीन बी मिळते. दररोजच्या जेवणामध्ये पालक, वाटाणे, मसूर डाळ यांचा समावेश असेल तर त्यातून शरीराला व्हिटॅमीन बी मिळते. त्यातून लाल आणि पांढऱ्या पेशींच्या वाढीसाठी पोषक तत्वे मिळतात.
लाल रक्त पेशी तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खाणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन 12 हे रेड मीट, मासे आणि शेलफिशमधून मिळते. लाल पेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी 12 महत्त्वाची भूमिका निभावते. तसंच व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे आरबीसीचे प्रमाणही कमी होते. यासाठी खाण्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. तसंच व्हिटॅमिन सी मिळणारी फळे आणि भाज्या खा.