
थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात.
Methi In Winters: थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. यात मेथी एक खास पालेभाजी आहे. यामध्ये अनेक फायदे लपले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये मेथी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. मेथी सर्वसाधारणपणे थंडीच्या दिवसातच जास्त येते. मेथीपासून अनेक पदार्थ तयार केले जातात. मेथीच्या पराठ्यापासून भाजीपर्यंत अनेकप्रकारचे पदार्थ बनवले जाऊ शकतात. मेथीच्या फायद्यांचा आपण लाभ घेतला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी फायदा
थंडीच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी मेथीची मदत होऊ शकते. मेथी एक स्वादिष्ट भाजी असून याने वजन कमी करण्यातही मदत होते. यात फायबरसोबतच अनेक पोषक तत्वे असतात. फायबर खाल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.
कोरोना, प्रेग्नंसी आणि आईचं मानसिक आरोग्य!
कॉलेस्ट्रॉलला करते कंट्रोल
शरीरातील वाढते कॉलेस्ट्रॉल आरोग्यासाठी धोकादायक असतं. मेथीच्या पाणामध्ये असलेल्या गुणांमुळे कॉलेस्ट्रालचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. मेथीचा जेवणात समावेश केल्याने कॉलेस्ट्रॉल व्यवस्थित राहण्यास मदत होते.
ब्लड शूगर राहिल कंट्रोलमध्ये
मेथी अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते. मेथीला आयुर्वेदामध्येही औषधाचा दर्जा मिळाला आहे. मेथीमध्ये हायड्रॉक्सिसिलुसीन नावाचे एक अमिनो अॅसिड असते, जे एकप्रकारे मधूमेह रोधक असते. याशिवाय, यातील ग्लॅक्टोमेननमुळे डायजेशनला मदत होते. यामुळे ब्लड शूगरही नियंत्रणात राहते.
थंडी गुलाबी असली तरी त्वचेची काळजी घ्यावीच लागते ना? जाणून घ्या खास टिप्स
हेल्थी त्वचेसाठी खा मेथी
त्वच्येच्या आरोग्यासाठी मेथी खूप चांगली असते. अँटी-ऑक्सिडेंट आणि अन्य आवश्यक विटॅमिनने युक्त असलेली मेथी आपल्याला त्वचेसंबंधी समस्यांना लढण्यापासून मदत करते. मेथी खाल्याने किंवा त्याचा पेस्ट त्वचेवर लावल्याने त्वचा तजेलदार होते. केसांनाही याचा फायदा होतो.
पचन चांगले होण्यासाठी मेथी
मेथी पचनासंबंधी समस्यांना दूर करण्यासाठी खूप मदतीची ठरु शकते. तुम्हालाही पचनासंबंधी काही समस्या असतील, तर मेथीचा आहारात नक्की समावेश करा. यामुळे गॅस आणि पोट जड होणे अशा समस्यांपासून आराम मिळतो.