योग सरावात घ्यायची काळजी 

देवयानी एम. योगप्रशिक्षक 
Tuesday, 20 October 2020

योग मुळात कसरतीसारखा करूच नये. योग सरावाचा उपयोग शरीराचे आरोग्य टिकवून अंतिमतः जागरूकता वाढवणे आणि सूक्ष्मात स्थिर होणे आहे. योगाने शक्ती खर्ची न पडता ती वृद्धिंगत होते.

आपण आजपर्यंत योगातील विविध क्रिया, आसने, प्राणायाम यांवर बोललो आणि त्यांचे अनेक फायदेही अभ्यासले. योगातील प्रकार तसे पाहिले तर सुरक्षित असतात, परंतु दोन गोष्टींमुळे त्यांच्या फायद्यापेक्षा जास्त अपायच होऊ शकतो. ते म्हणजे 

१. चुकीच्या पद्धतीने केलेला सराव, 

२. आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन केलेला सराव. 

योग मुळात कसरतीसारखा करूच नये. योग सरावाचा उपयोग शरीराचे आरोग्य टिकवून अंतिमतः जागरूकता वाढवणे आणि सूक्ष्मात स्थिर होणे आहे. योगाने शक्ती खर्ची न पडता ती वृद्धिंगत होते. हे समजून योगाकडे पाहिल्यासच आपण शरीराचे कुंपण ओलांडू शकू. त्यासाठी आधी हे पक्के समजून घ्या की, योग म्हणजे फक्त आसने नव्हेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता योग सरावात दुखापती का होतात व त्या कशा पद्धतीने टाळू शकतो ते पाहू - 
१. जलनेती करताना थंड पाणी वापरू नये. नाकातील म्युकस मेम्ब्रेन आणि सायनस अत्यंत संवेदनक्षम असतात, त्यांना दुखापत होते. म्हणून जलनेती कोमट पाण्याने करावी. 

२. जलनेती नंतर कपालभाती करून नाकातील पाण्याचा अंश पूर्णपणे काढावा, नाकात पाणी राहिल्यास सर्दी, डोके जड होणे किंवा कणकण दिवसभर राहू शकते. 

३. सूत्र (रबर) नेती करताना जोरात किंवा खूप घासून करू नये, हळूवारपणे करावी. रबर रुक्ष आणि कडक असल्याने इजा होऊ शकते. 

हेही वाचा : Pause; Take a deep breath in; Relax!

४. पेप्टिक अल्सर असलेल्यांनी वमनधौती करू नये. 

५. वातप्रधान प्रकृती असलेल्यांनी वस्त्रधौती करू नये. ही कफ प्रकृती असलेल्यांसाठी उपयोगी आहे. 

६. शंख प्रक्षालन कोमट पाण्याने करावे. शंख प्रक्षालन झाल्यावर त्या दिवशी हलके अन्न घ्यावे व आहारात ताक किंवा दही असावे. 

७. कपालभाती करताना जोरात झटके देऊन करू नये, हलक्या पद्धतीने करावी,पाठ ताठ ठेवावी. 

योग ‘ऊर्जा’ : श्‍वसनसंस्थेचे स्वरूप

८. कपालभाती करताना पाठ दुखी होत असल्यास समजावे की आपल्या कपालभातीचा वेग व तीव्रता (intensity) प्रमाणापेक्षा जास्त आहे. 

९. कपालभाती एकाच वेळी दीर्घकाळ न करता, थोड्या विश्रांतीने करावी, नाहीतर नाकात रुक्षता वाढेल. 

१०. मूळव्याध किंवा फिशर असलेल्यांनी बस्ती करू नये. 

११. ताप किंवा डोळे आले असल्यास त्राटक करू नये. 

१२. ध्यानात्मक आसने (सिद्धासन, पद्मासन, वज्रासन) करताना ताठ बसावे. या आसनांनी गुडघ्यांवर ताण येत असल्याने बैठक हळूहळू वाढवावी. 

१३. कंबर दुखी असलेल्यांनी शवासन पाय दुमडून करावे किंवा मकरासनात विश्राम करावा. 

१४. कोणतेही आसन आपल्या क्षमतेपेक्षा जास्त किंवा झटका देऊन शरीरास पीडा देऊन करू नये. 

१५. शीतली व सीत्कारीची माफक आवर्तने करावीत. 

१६. एकंदरीतच, काळजीपूर्वक व योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच योगाचा सराव करावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devyani m writes article about Take care in Yoga practice

Tags
टॉपिकस
Topic Tags: