Diabetes Symptoms : सावधान..! लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह; वेळीच दक्षता न घेतल्यास आयुष्यभर राहणार धोका

भारतात दरवर्षी किमान दहा लाख नवे डायबेटीस झालेले रूग्ण आढळतात.
Diabetes Symptoms
Diabetes Symptomsesakal
Summary

गेल्या २० वर्षात २०-३० वर्षाच्या तरूणांत आणि अलिकडे १ ते १९ वर्षे गटातही मधुमेहाचे रूग्ण आढळत आहेत.

Diabetes Symptoms : बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, पोष्‍टिक आहाराकडे झालेले दुर्लक्ष आणि रोजच्या जेवणातून गायब झालेला सकस आणि समतोल आहार, यामुळे १ ते १५ वर्षाखालील वयोगटांत मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वाढत आहे. वेळीच या आजारांकडे पालकांनी लक्ष दिले नाही, तर पाच-सहा वर्षांच्या मुलाला झालेला हा आजार आयुष्यभर त्याच्यासोबत रहाण्याचा धोका आहे.

भारतात दरवर्षी किमान दहा लाख नवे डायबेटीस झालेले रूग्ण आढळतात. यात १५ ते २० टक्के रूग्ण हे १ ते १५ वर्षाखालील लहान मुले असतात. ही चिंताजनक बाब आहे. पुर्वी आजी-आजोबा, त्यानंतर आई-वडील म्हणजे आता ५० ते ६० वयाचे लोक आणि आताच्या मुलांना लागत असलेली औषधे याचा विचार केला तर आजी-आजोबा डॉक्टरकडेच गेले नसतील, आई-वडिलांना थोड्याफार प्रमाणात औषधे लागली असतील पण तेही ५०-६० नंतर, पण आजच्या घडीला प्रत्येक घरात एक औषधांचा (Medicine) बॉक्स असतोच. याचे कारण आहे आपली जीवनशैली.

Diabetes Symptoms
Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

डायबेटीस दोन प्रकारचे आहेत. पहिल्या प्रकारात शरीरातील पेशी अजिबातच इन्सुलिन तयार करत नाहीत, तर दुसऱ्या प्रकारात त्या कमी प्रमाणात निर्माण करतात. दुसरा प्रकार काही वर्षानंतर होतो, त्याचे प्रमाणही कोविडनंतर आता वाढत आहे. ४० वर्षापुर्वी ५० वयापेक्षा जास्त लोकांची डायबेटीससाठी चाचणी व्हायची. विशी-तिशीतील तरूण आला, तर त्याला इतर आजारांची लक्षणे पहिल्यांदा पाहिली जायची, नंतर त्याची डायबेटीससाठी चाचणी व्हायची. पण गेल्या २० वर्षात २०-३० वर्षाच्या तरूणांत आणि अलिकडे १ ते १९ वर्षे गटातही मधुमेहाचे रूग्ण आढळत आहेत.

Diabetes Symptoms
Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

लक्षणे अशी...

लहान मुलांचा ज्यावेळी आपण वाढीचा आलेख पाहतो, त्यात उंची, वजन, त्याची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता यांचा एक ठोकताळा ठरलेला आहे. प्रत्येक माणसाची भूक, तहान याचाही एक ठोकताळा ठरलेला आहे. ज्यांची तहान, भूक खूप वाढलेली असते. पण, खूप पाणी पिऊन किंवा खाऊनही त्यांचे वजन खूप कमी व्हायला लागते. सामान्यपणे ज्यांची भूक जास्त असते. जे जेवण जास्त खातात, त्यांचे वजन जास्त दिसते. पण, अशा रुग्णांत ते कमी दिसते.

असे जे रुग्ण असतात किंवा सात-आठ वर्षांचा मुलगा असतो त्याच्या पालकांची आजपर्यंतची तक्रार कधी नसते की त्याने अंथरुणात लघुशंका केली आहे. पण, हा अचानक अंथरुणात किंवा कपड्यात लघुशंका करायला लागतो. त्याचे कारण त्याचे लघुशंकेवरील नियंत्रण सुटलेले असते. ही डायबेटीसच्या पहिल्या प्रकाराची लक्षणे आहेत. डोळ्याला अंधूक दिसणे किंवा प्रखर प्रकाशझोत सहन न होणे, ही लक्षणे सुध्दा मधुमेहाची आहेत. अनुवंशिकता हेही यातील मोठे कारण आहे.

कारणे काय

जुन्या काळातील दिवस आठवले तर मुले शाळेतून आली की, दप्तर टाकायचे आणि खेळायला जायचे. ही पध्दतच आता राहिलेली नाही. मुलगा सकाळी उठतो क्लासला जातो. शाळेतून येतो पुन्हा क्लासला जातो. त्यातून व्यायाम बंद झाला. पालकांच्या अपेक्षा आणि त्यातून अभ्यासाचा तणाव यामुळे तो कधी झोपी जातो, त्यालाच कळत नाही. त्याचबरोबर बेकरी पदार्थ आणि पिझ्झा, बर्गर, सँडविच, खाण्याचे प्रमाण वाढले. मर्यादित कुटुंब व्यवस्था, आई-वडील दोघेही नोकरीला, त्यातून मुलगा किंवा मुलगी जे म्हणेल ते होऊ लागले. त्यातून लहान वयातच मुलांच्या हाती मोबाईल आला. कोविडमध्ये मोबाईल सक्तीचा झाला, आता तो काढूनही घेता येत नाही, अशी स्थिती आहे. घरी जेवण करायचा कंटाळा. त्यामुळे समतोल व सकस आहारच मुलांना मिळत नाही, अशी कारणे मुलांतील मधुमेह वाढीमागे सांगितली जात आहेत.

Diabetes Symptoms
Health Tips : हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? 'या' कारणामुळे होते दातांभोवतीच्या हाडांची झीज

सकस व समतोल आहारच मुलांतील डायबेटीस रोखू शकेल. त्या आहारात वरण-भात, पोळी, कोशिंबिर, उसळ, तूप याचा समावेश असावा. मुलाला उत्तम प्रतीचे कार्बोहायड्रेटस, प्रथिने व फॅट मिळतील असा आहार जाईल याची काळजी घ्यावी. हा सगळा आहार घेतल्यानंतर तो पचन होण्यासाठी व्यायामाची गरज आहे. ही जर बांधणी व्यवस्थित झाली, तर मुलाची वाढ व्यवस्थित होईल, त्यातून डायबेटीससारख्या आयुष्यभर जडणाऱ्या आजारांपासून तो दूर राहील.

- डॉ. शरद टोपकर, मधूमेह तज्ज्ञ

माझ्या मुलीला नऊ वर्षांची असताना डायबेटीस झाला. ती आता १३ वर्षांची आहे. पहिल्या प्रकारातील डायबेटीस तिला झाला आहे. म्हणजे ज्यात इन्सुलीन तयारच होत नाही. माझ्या आईला वयानुसार हा आजार आहे. पण, घरी कोणालाही हा आजार नाही. पण, मुलीला झाला.

- मधुमेहग्रस्त मुलीचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com