काळजी घ्या! Kiss घेतल्यानं होऊ शकतात आजार

काळजी घ्या! Kiss घेतल्यानं होऊ शकतात आजार

आपल्या आवडत्या व्यक्ती/जोडीदाराचं चुंबन (kiss) घेणं ही एक सामान्य आणि सर्वात सुंदर अनुभव आहे. पण चुंबन (kiss) घेण्याचे काही प्रमाणात नुकसानही आहे. ज्यावेळी तुम्ही चुंबन घेत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, समोरच्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास (medical history ) तुम्हाला माहीत नसते आणि याबाबतचा विचारही डोक्यात येत नसेल. पण, योग्य काळजी न घेतल्यास तुम्हाला गंभीर आजारांना सामोर जावं लागू शकतं. चुंबन घेतल्यानं तुम्हाला आजारांचा सामनाही करावा लागू शकतो. चुंबन पाहूयात कोणते आजार होतात. (diseases you can get by kissing)

 diseases you can get by kissing
diseases you can get by kissing

इन्फेकशन होण्याची शक्यता

इन्फ्लुएंझा (Influenza) -

इन्फ्लुएंझा हा संसर्गाने होणारा श्वसनाचा आजार असून त्यामुळे नाक, घसा व फुप्फुसे यांना विषाणूंची बाधा होऊन त्यामुळे आरोग्य धोक्यात येते. थुंकी अथवा लाळेच्या माध्यामातून इन्फ्लुएंझा आजाराचा संसर्ग होण्याची भीती आहे. शिंक, खोकला अथवा चुंबनाद्वारे या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. अंग दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि ताप यासारखी लक्षणे या आजाराची आहेत.

परिसर्प Herpes

चुंबनाद्वारे परिसर्प आजाराचा संसर्ग होऊ होतो. तोंडाच्या आत आणि आसपासच्या भागात वेदनादायक फोड किंवा अल्सर या स्वरूपात असतात. लोकांना खाज जाणवते,फोड येण्यापूर्वी क्षेत्रात खोकला किंवा जळजळ होते.

 diseases you can get by kissing
diseases you can get by kissing
काळजी घ्या! Kiss घेतल्यानं होऊ शकतात आजार
झूम मिटिंगमध्ये व्यस्त पतीचं पत्नीनं घेतलं चुंबन; हर्ष गोयंका, आनंद महिंद्रांनीही शेअर केला मजेशीर व्हिडिओ

सिफिलीस, syphilis

शारीरिक संबधाद्वारे हा आजार पसरला जातो. चुंबन अथवा शारीरिक संबधाद्वारे या आजाराचा संसर्ग वाढतो. यामध्ये तोंडात फोड येतात. antibiotics द्वारे हा आजार दूर केला जाऊ शकतो.

मेंदूच्या वेष्टनाचा दाह, Meningitis

चुंबनाद्वारे Meningitis हा आजार उद्भवू शकतो. मान दुखणे, सतत ताप येणे आणि डोकेदुखीसारख्या आजारांचा या आजाराच्या लक्षणांमध्ये समावेश आहे.

श्वसनसंस्थेचे विकार, Respiratory viruses

वातावरणातील बदलांमुळे श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. चुंबनाद्वारे श्वसनासंबधित विकाराचा संसर्ग होऊ शकतो.

हिरड्यांचा आजा Gum diseases

इन्फेकटेड व्यक्तीचं चुंबन घेतल्यास हिरड्यांचा आजार Gum diseases उद्भवू शकतो.

अशी घ्या काळजी

ब्रश करणे आणि कोमट पाण्यानं गुळण्या केल्यास या आजारांपासून दूर राहू शकता.

बॅक्टेरियामुळे दाताचे आजारही उद्भवू शकतात. त्यामुळे चुंबना आधी आणि नंतर दात साफ करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com