जीम जाणाऱ्यांनी करू नका 'ही' चूक, राजू श्रीवास्तवला याच कारणांनी आलेला हार्ट अटॅक

एक्जरसाईज किंवा फिजीकल अॅक्टिव्हिटी करताना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण फार वेगाने वाढत असल्याचं दिसतंय.
Dont do over jym work- know the reason of Raju Shrivastav heart failure
Dont do over jym work- know the reason of Raju Shrivastav heart failureesakal
Updated on

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅकमुळे दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. ५८ वर्षीय राजू श्रीवास्तव यांना ट्रेडमिलवर धावता धावता हार्ट अटॅक आला होता. त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं आणि ते खाली पडले होते. अलीकडे जिममध्ये एक्जरसाईज किंवा फिजीकल अॅक्टिव्हिटी करताना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण फार वेगाने वाढत असल्याचं दिसतंय. हार्ट अटॅकची काही गंभीर कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत. (Dont do over jym work- know the reason of Raju Shrivastav heart failure)

जीममध्ये एक्जरसाईज करणाऱ्यांचं बीपी किंवा कोलेस्ट्रॉल लेवल बरोबर असेल म्हणून त्यांना हार्ट अटॅक अजिबात येणार नाही असं मूळीच नाही. अर्थात अशांनाही हार्ट अटॅक येऊ शकतो. अनेकदा अनुवांशिकतेमुळेही हार्ट अटॅक येतो. तर तुमची अयोग्य लाईफस्टाईलही तुमच्या आयुष्यात गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. असं डाक्टरांचं म्हणणं आहे.

Dont do over jym work- know the reason of Raju Shrivastav heart failure
Heart Attack : ३ वर्ष आधीच समजेल हृदयविकाराचा धोका, वैज्ञानिकांचा दावा

जास्त वयाच्या लोकांना धोका

हृदयाशी संबंधित आजारांना किती धोका असू शकतो ते वयावरही अवलंबून असतं. रेग्युलर एक्जरसाईज करणाऱ्या कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयाच्या आजारांचा धोका कमी असतो. मात्र उतरत्या वयात एक्जसाईज करणाऱ्यांमध्ये हृदयाच्या आजारांचं प्रमाण जास्त असते. या विषयावर एक्जरसाईज फिजिओलॉजिस्ट मायकल जॉयनर म्हणतात की, वाढत्या वयानुसार ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे त्यांनी नियमित चेकअप करत राहावे.

एक्जरसाईज करतावेळी हार्ट अटॅकचा धोका का ?

तज्ज्ञ म्हणतात की, आपल्या शारिरीक क्षमतांचा विचार करून आपण एक्जरसाईज करायला हवी. अनेकदा अनफिट लोकं जीममध्ये खूप घाम गाळतात. त्याचा परिणाम सरळ तुमच्या हृदयावर होतो. मॅरेथॉन रनर्सवर झालेल्या एका स्टडीनुसार असं निदर्शनास आलंय की, त्यांच्या रनिंगनंतर त्यांच्या ब्लड सँपलमध्ये हार्ट अटॅकशी संबंधित बायोमार्कर बनायला सुरूवात होते. नंतर ते काळानुसार रिकवरही होतात. मात्र सतत स्ट्रेस असताना हे बायोमार्कर गंभीर रूप घेण्यास सुरूवात होते.

Dont do over jym work- know the reason of Raju Shrivastav heart failure
Health Awareness: एकटेपणा घातक ? वाढू शकतो हृदय आणि रक्तवाहिन्यांचा धोका, तज्ञांचं मत

हेवी वेट ट्रेनिंग टाळा

अमेरिकेतील एका हार्ट इंस्टिट्युट असोसिएट डायरेक्टर सुमित चौगच्या मते, काही जण मस्क्युलर बॉडी बनवण्याच्या नादात जास्त वजन उचलतात आणि ते अनेकदा धोकादायक ठरतं.

ही लक्षणे असल्यास टाळाटाळ करू नका

जेव्हाही तुम्हाला गंभीर आजार उद्भवतो तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला काही लक्षणं दाखवत असते. मात्र अनेकजण या लक्षणांकडे दूर्लक्ष करतात. एक्सपर्ट सांगतात की, बहुतेक लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या आठवड्याभऱ्यापूर्वी त्याची लक्षणं दिसायला सुरूवात होते. वेळेत ही लक्षणं लक्षात आली तर मोठा धोका टळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com