"परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आहारात सलाडचे भरपूर प्रमाण वाढविले पाहिजे, चहा-कॉफीऐवजी नारळ पाणी घेतल्यास ते शरीरासाठी उत्तम आहे. यामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते."
हिंगोली : परीक्षेचा (Exam) काळ विद्यार्थ्यांसाठी सर्वांत जास्त तणावाचा असतो. विद्यार्थी (Students) तहान-भूक विसरून आहाराकडे दुर्लक्ष करून सतत अभ्यास करतात. सततच्या सलग बैठकीमुळे शरीराला स्थूलता, मरगळ आणि ग्लानी येते. व्यायामाच्या अभावाने परीक्षा काळात मनात नकारात्मक भाव निर्माण होतो. अशावेळी डॉक्टर (Doctor) परीक्षेच्या काळात शरीराला ऊर्जा देणारा सात्त्विक आहार घेण्याचा सल्ला देतात.