esakal | कोरोनामुळे तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय का? काय सांगते आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

mental issue

कोरोनामुळे तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगभरामध्ये सर्वांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतील नियमित चढउतार होत आहेत. शाळांचे चालू शैक्षणिक वर्ष अपेक्षेप्रमाणे सुरू झाले नाही. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि नव्याने आढळलेल्या डेल्टा प्रकार यामुळे अजूनही अनिश्चितता आहे. जागतिक महामारीमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, कॅनडामधील तरुणांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु जेवढा तो बातम्यांमध्ये दिसतोय, नेमका तितकाच तरुणांवर परिणाम झाला आहे का? तरुणांवर खरंच नकारात्मक परिणाम होतोय का ? आपल्याकडे याविषयी काही आकडेवारी उपलब्ध आहे का की, जिच्या आधारे आपण ते स्पष्ट करु शकू...

हेही वाचा: Share Market मध्ये आजही तेजी कायम; कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

जुनी आणि वर्तमान माहिती-

कॅनेडियन तरुणांबद्दल जागतिक साथीच्या आधीच्या काळापासूनची विश्वसनीय आकडेवारी शोधणे कठीण आहे. काही दशकांपासून, आपण १९८७ च्या ओंटारियो बाल आरोग्य अभ्यास आणि त्याच्या निष्कर्षांवर अवलंबून आहोत की देशातील पाच तरुणांपैकी एक तरुण मानसिक विकाराने ग्रस्त आहे. त्या काळात चार ते १६ वर्षे वयोगटातील १८.१ टक्के मुले एक किंवा अनेक विकारांनी ग्रस्त होती. ३० वर्षांनंतरही, २०१४च्या ओंटारियो बाल आरोग्य अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, भावनिक आणि प्रत्यक्ष विकारांसंबंधातील आकडेवारी जवळजवळ एकसारखीच आहे.

हेही वाचा: मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात करा या घटकांचा समावेश

पालक आणि मुलांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार,१२ ते १७ वयोगटातील अनुक्रमे १८.२ टक्के आणि २१.८ % किशोरवयीन मुले कोणत्या ना कोणत्या विकारानं ग्रस्त आहेत. ही आकडेवारी मानसिक समस्यांनी ग्रस्त कॅनेडियन तरुणांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ दाखवत नाही

काही तरुणांनी सांगितलं की, त्यांच्या सामाजिक, वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवनावर साथीच्या आजाराचे नकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत, परंतु सर्व क्षेत्रांमधील नमुन्यातील १० पैकी सातपेक्षा जास्त तरुणांनी कोविड १९ नंतर आपण मानसिकदृष्ट्या सामान्य असल्याचे सांगितलं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर चिंताजनक बातम्यांच्या अगदी उलट बहुतेक तरुण या साथीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करत आहेत.

पण उर्वरित ३० टक्के तरुणांचे काय?

त्यांनी स्वतः वर्णन केलेल्या त्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधित लक्षणांचा अर्थ असा तर नाही की, तरुणांच्या मानसिकतेवर खरंच या साथीने परिणाम झालाय? अंशतः याचे उत्तर आपल्याला मानसिक विकार (मानसिक आरोग्य साक्षरता) समजून घेण्यासाठी वापरत असलेल्या भाषेत असू शकते. सोप्या शब्दात सांगायचं झाले तर उदास वा एकटे वाटणे म्हणजे नैराश्य नाही; चिंता किंवा अस्वस्थतेची भावना चिंतेशी संबंधित कोणताही रोग नाही. आपल्यासमोरचं आव्हान म्हणजे त्यांचे दुःख आणि चिंता मान्य करणे आणि त्यांची चिकाटी आणि दृढनिश्चयाला साथ देणं हे आहे.

loading image
go to top