esakal | उच्च रक्तदाबाकडे नको दुर्लक्ष, हवे नियंत्रण

बोलून बातमी शोधा

0Blood_Pressure_1}

उच्च रक्तदाब वरवर साधारणतः वाटणारी बाब; परंतू या यामुळे विविध व्याधींना निमंत्रण मिळते. या व्याधीचा थेट हृदय, मेंदूशी संबंध असतो. त्यामुळे या व्याधीकडे दुर्लक्ष नको.

उच्च रक्तदाबाकडे नको दुर्लक्ष, हवे नियंत्रण
sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद :  उच्च रक्तदाब वरवर साधारणतः वाटणारी बाब; परंतू या यामुळे विविध व्याधींना निमंत्रण मिळते. या व्याधीचा थेट हृदय, मेंदूशी संबंध असतो. त्यामुळे या व्याधीकडे दुर्लक्ष नको. यावर नियंत्रण मिळवुन व्याधी कमी करणे प्रत्येकाच्या हाती आहे. माणसाच्या शरीरातील नैसर्गिक रक्तदाबापेक्षा जास्त दाब उच्च रक्तदाबात मोडतो. शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हातापायांच्या लहानलहान रक्तवाहिन्यांच्या आवरणाभोवती जमा होतात.

शरिरातील कोलेस्ट्रालचे प्रमाण वाढले की, रक्तवाहीन्यात गाठी तयार होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. रक्तदाब साधारणतः सामान्य, उच्च व कमी अशा प्रकारात असतो. अर्थात सिस्टोलिक व डायस्टोलिक असे वर्गिकरणही होते. सामान्य रक्तदाब १२० ते ८० असतो. उच्च रक्तदाब १४० ते ९० पेक्षा अधिकचा रक्तदाब ‘उच्च रक्तदाब’ असतो. १०० ते ६० असा रक्तदाब असेल तर तो ‘लो बीपी’ असतो.

लाइफस्टाईल कोच : बहुगुणी कवठ

ही आहेत कारणे
-अनियमित जेवण, पचन न होणे, वजन वाढणे, व्यायामाचा अभाव, अती मानसिक ताण-तणाव, पुरेशी झोप न होणे, आनुवंशिक कारणे, स्थूलता, दगदग, आहारात जंक-फास्ट फूडचा समावेश, मिठाचे प्रमाण अधिक असणे, चिंता, राग, भीती इत्यादि मानसिक विकार.

या समस्या रक्तदाबाशी निगडीत
उच्च रक्तदाब हळूहळू वाढत जाणारा विकार आहे. चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे, पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे अशी ही लक्षणे दिसून येतात. खसखस आणि टरबूजाच्या बियांचा गर वेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे. सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोप सुद्धा चांगली लागते. एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास (आठवडाभर) उच्च रक्तदाब कमी होतो. मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो. तुळशीचे चार पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावी. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.

इतर आजाराला निमंत्रण
सातत्याने वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो म्हणजेच अर्धांगवायूचा झटका येतो.

वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष राठोड यांनी सूचविलेले उपाय
-प्रत्येकाने आवश्‍यकतेनूसार हृदयाची तपासणी करावी.
-दर तीन महिण्याला रक्तदाब तपासावा.
-नियमित व्यायाम करा, बैठकीचे काम जास्त वेळ करु नका.
-चालणे, खेळणे, धावणे या बाबी करा.
-ताण घेऊ नका, वेळेवर झोप, जेवण असावे, आनंदी रहा.
-योगासने, प्राणायाम करा, तूप, तेलकट पदार्थ टाळा.

Edited - Ganesh Pitekar