स्वयंपाकाच्या ‘तयारी’तच मोठी पोषकता 

स्वयंपाकाच्या ‘तयारी’तच मोठी पोषकता 

तुमच्या स्वयंपाकाची प्रक्रिया योग्य प्रकारे राबवून तुमचं अन्न तुम्ही अधिक पोषक बनवू शकता. आपण कोणते अन्नपदार्थ खातो, त्यांच्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करतो आणि स्वयंपाकाचं तंत्र कशा प्रकारे वापरतो या सगळ्या गोष्टी आपलं आरोग्य आणि ‘वेल बीइंग’साठी अतिशय महत्त्वाच्या असतात. स्वयंपाक करताना योग्य काळजी घेतली नाही, तर अनेक पोषक घटक नष्ट होऊ शकतात. अन्न वरवर चविष्ट, सुंदर आणि आकर्षक वाटलं, तरी त्यात पोषक घटक असतीलच असं नाही. 

स्वयंपाक करणारी व्यक्ती योग्य प्रकारे ‘हायजिन’ म्हणजे स्वच्छता पाळते आहे की नाही याची खबरदारी घ्या : त्या व्यक्तीने व्यवस्थित स्नान केलेलं असावं, हात स्वच्छ असावेत, नखं कापलेली असावीत. (सोवळ्यातील स्वयंपाक हा शब्दप्रयोग इथं केवळ स्वच्छतेच्या अनुषंगानं बघायला हवा.) जी व्यक्ती स्वयंपाक करते आहे तिनं वर्षातून दोनदा ‘डिवर्मिंग’ (deworming) केलं पाहिजे असंही बघा. 

मोड आणणं (Sprouting): 
जेव्हा डाळी, कडधान्यं किंवा धान्यांना मोड येतात, तेव्हा त्यांच्यातले सी व्हिटॅमिन, बी-कॉंम्प्लेक्स आदी व्हिटॅमिन्स अधिक सुधारित स्वरूपात उपलब्ध होतात. त्यामुळेच आपण मोड आलेल्या डाळी, कडधान्यं आणि धान्यं रोज खाल्ली पाहिजेत. 

आंबवणं (Fermenting) : 
आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे डाळी आणि तृणधान्यं यांच्यातली पोषकता आणखी वाढते. योग्य प्रकारे आंबवलेलं अन्न हे चयापचय संस्थेच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे प्रोटिन्स पचण्याची क्षमता वाढते आणि बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्सचं प्रमाण वाढतं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साली काढणं (Peeling) : 
- जिथं शक्य आहे तिथं साली न काढता स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा. 
- नेहमी फळं आणि भाज्या धुतल्यानंतरच त्यांची सालं काढा. 
- शिजवण्यच्या किंवा खाण्याच्या अगदी थोडा वेळ आधीच साली काढा. 
- साली शक्य तितक्या पातळ काढा- कारण सालींच्या अगदी खालीच जास्तीत जास्त पोषक घटक असतात. 

चिरणं (Cutting)/बारीक तुकडे करणं (Chopping)/ काप करणं (Slicing) : 
कोणताही घटक धुतल्यानंतरच चिरा किंवा त्याचे काप करा. तुम्ही चिरल्यानंतर संबंधित घटक धुतले, तर त्यामुळे अनेक महत्त्वाचे पोषक घटक नष्ट होण्याची शक्यता असते. 
- तुम्ही जेव्हा स्वयंपाकासाठी किंवा खाण्यासाठी सज्ज असाल, तेव्हाच हे घटक चिरा. खूप आधी चिरून ठेवू नका. 
- भाज्या खूप बारीक चिरू नका. भाज्या जितक्या बारीक चिरल्या जातात, तितका त्यांचा जास्त भाग हवेच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे पोषकता कमी होत जाते. 

भिजवणं (Soaking) : आपण अनेकदा मऊ होण्यासाठी, शिजायला किंवा पचायला सोपी होण्यासाठी धान्यं किंवा कडधान्यं भिजत घातलो. 
- नेहमी धान्यं किंवा कडधान्यं भिजत घालण्यापूर्वी धुवा. 
- ते घटक बुडतील इतपतच त्यांच्यात पाणी घाला. ते पाणी फेकून देऊ नका. ते शिजवताना वापरा. 
- धान्यं किंवा कडधान्यं खूप वेळ भिजत घालू नका. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिजवणं (Cooking) : 
शक्य तितक्या मंद आचेवर शिजवणं हे नेहमी चांगलं. पदार्थ मंद आचेवर शिजवले, तर त्यातले पोषक घटक सुधारण्याची शक्यता असते. 
स्वयंपाकासाठीची योग्य तंत्रं वापरून अन्नपदार्थ अधिक पोषक बनवण्यासाठीचे हे काही कानमंत्र आहेत. असंही म्हणतात, की स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव, माया आणि प्रेम या गोष्टींचंसुद्धा प्रतिबिंब पदार्थांत पडतं. ‘होम कुकिंग’ म्हणजे घरच्या स्वयंपाकाची तीच खरी ‘लज्जत’ आहे.

डॉ. मनीषा बंदिष्टी, ओबेसिटी आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट कन्सल्टंट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com