भारतीय पोषण खजिना : खाण्याचा डिंक

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 1 December 2020

भारतात अनेक भाज्या, फळं, कडधान्यं आणि डाळी यांचा पोषक खजिना उपलब्ध आहे. त्यातल्या काहींची आपण ओळख करून घेत आहोत. या वेळी खाण्याच्या डिंकाची माहिती करून घेऊ. 

भारतात अनेक भाज्या, फळं, कडधान्यं आणि डाळी यांचा पोषक खजिना उपलब्ध आहे. त्यातल्या काहींची आपण ओळख करून घेत आहोत. या वेळी खाण्याच्या डिंकाची माहिती करून घेऊ. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

  • खाण्यासाठीचा डिंक हा उष्णताकारक मानला जातो आणि शरीरात उष्णता तयार होण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळे तो सर्वसाधारणपणे हिवाळ्यात खाल्ला जातो.
  • डिंक रोगप्रतिकारशक्ती, स्टॅमिना आणि एकूण आरोग्य वाढविण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. 
  • हा डिंक खूप पोषक असतो आणि तो कॅल्शियम आणि प्रोटिन्सनी युक्त असतो. त्यामुळे तो लहान आणि वाढत्या वयातली मुलं, गर्भवती महिला आदींसाठी खूप उपयुक्त असतो.

खाण्याचा डिंक यांच्यासाठी उपयुक्त असतो
गर्भवती महिला
गर्भवती स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी डिंकाचा लाडू हा एक पदार्थ. पारंपरिकदृष्ट्या तो महत्त्वाचा मानला जातो; कारण त्यात कॅल्शियम आणि प्रोटिन भरपूर असते. हाडं चांगली होण्यासाठी आणि पाठीचे दुखणे कमी होण्यासाठी तो मदत करतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्तनदायी माता
स्तनदायी मातांनाही डिंकाचे लाडू दिले जातात; कारण त्यामुळे मातेच्या दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी उपयोग होतो, असे मानले जाते. त्याला अजून शास्त्रीय आधार मिळाला नसला, तरी एकूण आरोग्य सुधारण्यासाठी तो नक्कीच उपयुक्त असतो.

सर्दी आणि खोकला
खाण्याच्या डिंकामुळे एकूण रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विशेषतः हिवाळ्यात होणारी सर्दी आणि खोकला हे त्यामुळे रोखले जाऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिक
खाण्याच्या डिंकात प्रोटिन आणि कॅल्शियम खूप असल्याने तो हाडं आणि सांध्यांसाठी उपयुक्त असतो. रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी तो मदत करतो. तो थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. या सगळ्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा वापर करून तयार केलेले पदार्थ नियमितपणे खाल्ले पाहिजेत.

ऊर्जा वाढविणे
डिंकाचा एक लाडूसुद्धा इतकी ऊर्जा देतो, की ती काही तास टिकते. त्यात तूप आणि इतर अनेक पौष्टिक घटकही वापरले जात असल्यामुळे तो लहान मुलांसाठी परफेक्ट एनर्जी फूड ठरतो.

रोज कसा खायचा?
तुम्हाला डिंकाचे लाडू किंवा चिक्की तयार करणे हे वेळखाऊ काम वाटत असले, तर तुम्ही ही रेसिपी वापरून त्याचा रोजच्या आहारात समावेश करू शकता.

  • खाण्याचा डिंक आणि पावडरच्या स्वरूपातला गूळ सम प्रमाणात घ्या. (सुरुवातीला कमी प्रमाण घ्या.) थोडे तूप तापवा आणि त्यात डिंक घाला. तो थोडा वितळल्यानंतर थोडे पाणी घाला; म्हणजे हा डिंक पूर्णपणे विरघळेल. गॅस बंद करा. तुम्ही हे मिश्रण एक कप दुधात घालून त्यात वेलदोडा पावडरसारखे तुमच्या आवडीचे भारतीय घटकही समाविष्ट करू शकता. 
  • डिंक तुपात परता. तो गार होऊ द्या. त्याची पावडर तयार करा. तुम्ही ही पावडर नंतर गुळाच्या पावडरसहित दुधाच्या ग्लासमध्ये वेलदोडा पावडरसह घालू शकता.
  • हे पेय चहाऐवजी प्या. गरम असतानाच प्या. त्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि आरोग्यदायी वाटेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr manisha bandisthi write article on Eating gum