हेल्दी डाएट : कडधान्यांना मोड आणणे महत्त्वाचे का?

मोड येणे म्हणजे एखाद्या बीला अंकुर फुटून नवीन रोपे तयार होणे. बियांना अंकुर फुटण्यासाठी त्या अनेक तास पाण्यात भिजत घालून उष्णता आणि आर्द्रता असलेल्या ठिकाणी काही दिवस तसेच राहू द्या.
Cereals
Cerealssakal
Summary

मोड येणे म्हणजे एखाद्या बीला अंकुर फुटून नवीन रोपे तयार होणे. बियांना अंकुर फुटण्यासाठी त्या अनेक तास पाण्यात भिजत घालून उष्णता आणि आर्द्रता असलेल्या ठिकाणी काही दिवस तसेच राहू द्या.

- डॉ. रोहिणी पाटील

मोड म्हणजे काय?

मोड येणे म्हणजे एखाद्या बीला अंकुर फुटून नवीन रोपे तयार होणे. बियांना अंकुर फुटण्यासाठी त्या अनेक तास पाण्यात भिजत घालून उष्णता आणि आर्द्रता असलेल्या ठिकाणी काही दिवस तसेच राहू द्या. हे करून झाल्यावर त्या बियांना साधारण दोन इंच लांबीचे मोड येतील. अनेक प्रकारच्या बियांना मोड येतात त्यात सोयाबीन, मूग, घेवडा, ब्राऊन राइस, राजगिरा, ओट्स यांचा समावेश होतो.

अंकुर फुटणे महत्त्वाचे का? - फायटिक ॲसिड बदाम, ब्राऊन राइस, मटार, सोयाबीन, गव्हाचा कोंब इत्यादी वनस्पतींच्या बियांमध्ये आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. फायटिक ॲसिड जस्त, लोह आणि कॅल्शिअमचे शोषण कमी/प्रतिबंधित करण्यासाठी ओळखले जाते. इतकेच नाही, तर त्यामुळे पोट फुगणे, गॅस, पोटदुखी, जुलाब या समस्यादेखील उद्भवतात. अंकुर फुटताना, बियाण्यांना अनुकूल वातावरण आणि पुरेसे पाणी दिल्यास, फायटिक ॲसिडचे फॉस्फरसमध्ये विभाजन होऊन अंकुर फुटण्याची प्रक्रिया सुरू होते. अंकुर आल्यानंतर, ते सहज पचतात आणि इतर मिनरल्सच्या शोषणात अडथळा आणत नाहीतच, पण अनेक फायदे देखील देतात.

कोंब येण्याचे फायदे?

आरोग्यास लाभदायक असणाऱ्या मोड आलेल्या कडधान्यांत बहुतेकदा ‘पौष्टिक’ असे लेबल लावले जाते, ते अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अशा अनेक लाभदायक घटकांनी समृद्ध असते. अर्धा कप कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांतून तुम्हाला निम्म्याहून अधिक दिवसाला गरजेची असलेली जीवनसत्वे पुरवली जाता आणि दैनंदिन गरजेच्या बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनपैकी जवळपास ८५ टक्के बी-कॉम्प्लेक्स देतात.

आतड्यासाठी अनुकूल - मोड आलेल्या कडधान्यांमध्ये एन्झाईम्सचे लक्षणीय प्रमाण असते. हे तुमचे चयापचय वाढवतात आणि शरीरातील रासायनिक प्रक्रिया सुधारतात, विशेषत: तुमची पचनक्रिया. अन्न पचवण्यासाठी आणि पचनमार्गाद्वारे पोषक तत्त्वांचे शोषण वाढविण्यासाठी एन्झाइम्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे पचन नियंत्रित करण्यास हातभार लावते. हे तुमचे आतड्याचे आरोग्य सुधारण्यात मदत करतात आणि सौम्य किंवा तीव्र बद्धकोष्ठता टाळतात.

हृदयासाठी उपयुक्त - मोड आलेले कडधान्य हे ‘टाइप 2’ मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे इतर औषधांची गरज कमी भासते. इतकेच नाही, तर निरोगी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी नियंत्रित ठेऊन एचडीएलची पातळी वाढवून एकूण आरोग्यामध्ये सुधारणा आणतात.

चविष्ट पर्याय - मोड आलेल्या कडधान्याचे फायदे केवळ पौष्टिकतेबद्दलच नाही, तर त्यांच्या चांगल्या चवीबद्दल देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होते. याव्यतिरिक्त, तुम्ही स्वतः कडधान्यांना मोड आणून ते वाढवल्यास मजेदार आणि आरोग्यदायी छंद होऊ शकतो.

असा करा कडधान्यांचा समावेश

  • मोड आलेल्या मुगाचे धिरडे किंवा डोसा.

  • वाफवलेले मुग/मटकी चाट.

  • मोड आलेली कडधान्ये तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाजी म्हणूनदेखील घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com