
हेल्दी डाएट : आंबा - गैरसमज आणि तथ्य
- डॉ. रोहिणी पाटील
उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि ह्या काळात आपल्याला स्वादिष्ट आणि रसाळ आंबे मिळतात. आंबा फळांचा राजा. आनंद देणारे हे फळ मानवजातीसाठी एक पौष्टिक वरदान आहे. त्याचे तंतुमय स्वरूप तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मुक्त करते आणि तुमचा कोठा साफ ठेवण्यासह शरीर डिटॉक्सिफाय करण्यातही मदत करते. लोकांमध्ये आंब्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांच्यापैकी काही गैरसमज आपण आज दूर करूया.
गैरसमज १ :
आंबा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील उष्णतेची समस्या वाढते.
वस्तुस्थिती - खाण्यापूर्वी किमान एक तास आंबा पाण्यात भिजवा. त्यामुळे त्याची नैसर्गिक उष्णता कमी होते आणि तुमच्या शरीरावर फार परिणाम करत नाही.
गैरसमज २ :
दररोज आंबा खाल्ल्याने वजन वाढू शकते.
वस्तुस्थिती - तुम्ही दररोज एक लहान आकाराचा आंबा खाल्ल्यास तुमचे वजन वाढणार नाही, कारण आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह, पोटॅशियम आणि कॉपर असते. आंब्यातील फायबरचे प्रमाण पोट भरल्याची आणि तृप्ततेची भावना देते. फळाचा जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी आमरसाच्या रूपात आंबा खाण्यापेक्षा संपूर्ण फळ खाण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, संयम ही गुरुकिल्ली आहे!
गैरसमज ३ :
आंब्यामुळे मुरूम येऊ शकतात.
वस्तुस्थिती - व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे मुरूम येण्याची शक्यता असते. सुदैवाने, आंब्यामध्ये ही जीवनसत्त्वे, तसेच अॅन्टिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या शरीरातील केराटिन प्रोटिनचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे, तुमच्या रोजच्या आहारात निसर्गनिर्मित व्हिटॅमिन ए, खनिजे, प्रथिने,ॲन्टिऑक्सिडंट्स आणि इतर अनेक गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या ह्या फळाचा आनंद घ्या. हे फळ चवीबरोबरच आरोग्यासाठीही लाभदायक आहे.
आंब्याचे फायदे
आंबा हे व्हिटॅमिन ‘ए’चा उत्तम स्रोत आहे, जे चांगल्या दृष्टीसाठी गरजेचे आहे.
यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’देखील भरपूर असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते
मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमचे उत्कृष्ट स्रोत आहे, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सारखी अँटी-ऑक्सिडेंटदेखील भरपूर असतात, जी उत्कृष्ट वृद्धत्वविरोधी तत्त्व म्हणून काम करतात.
आंब्यातील पाणी आपल्याला संपूर्ण उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यास मदत करते.
Web Title: Dr Rohini Patil Writes Healthy Diet Mango Misconceptions And Facts
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..