आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दररोज नारळपाणी प्याच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

भारतामध्ये नारळ पाणी खूप लोकप्रिय आहे. नारळ पाण्याचे रोज सेवन केल्यास ते वजन कमी करण्यास मदत करते.

पुणे : आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जो तो नेहमीच प्रयत्नशील असतोच. त्यासाठी अनेकजण आपआपल्या परीने काळजी घेतो. आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर नेहमीच नारळ पाणी प्यायला सांगतात. नारळ पाणी पिताना खूप चवदार लागते पण तुम्हाला नारळाच्या पाण्याचे फायदे काय आहेत ते माहित आहे का? चला तर मग ते जाणून घेऊयात.

नारळ पाणी हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यात  विटामिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट असतात. तसेच यामध्ये कॅलरिज आणि फॅट हि कमी असतात. भारतामध्ये नारळ पाणी खूप लोकप्रिय आहे. नारळ पाण्याचे रोज सेवन केल्यास ते वजन कमी करण्यास मदत करते. तरीही आपण डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे त्याचे सेवन करा. 

नारळ पाणी पिण्याचे फायदे 

१) नारळ पाण्याचे सेवन हे लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये एंटी-ऑक्सीडेंट गुण असतात, जे यकृतातील अनेक प्रकारच्या विषाक्त पदार्थोंच्या क्रिया कमी करते. नारळाचे पाणी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. 

२) नारळ पाणी सेवन करणे हे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे सर्वात फायद्याचे आहे. हे पहाटेची सुस्तपणा दूर करते आणि नवीन उर्जा देते, जेणेकरुन आपण दिवसभर ताजेतवाने राहाल. 

३) हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाबात) नारळ पाण्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

४) नारळपाण्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तसेच हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविण्यात मदत करते. त्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.

५) नारळ पाण्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी केला जातो. त्यात कॅलरी कमी असल्यामुळे ते पचणे सोपे जाते, असे अनेक घटक त्यात आढळतात, जे वजन आणि लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drinking coconut water every day is beneficial if you want to stay healthy