esakal | सगळं ठीक पण, मानसिक आरोग्याचं काय? तुम्हीच करा स्ट्रेस मॅनेजमेंट
sakal

बोलून बातमी शोधा

सगळं ठीक पण, मानसिक आरोग्याचं काय? तुम्हीच करा स्ट्रेस मॅनेजमेंट

मन व शरीर यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो,हजारो वर्षांपासून आपण जगाला सांगत आहोत.आपले ऋषिमुनी हाच संदेश देत होते.पण,आधुनिक काळात ऋषिमुनींच्या या संदेशाकडे आपलं दुर्लक्ष झालं.

सगळं ठीक पण, मानसिक आरोग्याचं काय? तुम्हीच करा स्ट्रेस मॅनेजमेंट

sakal_logo
By
डॉ. संजय फडके, मानसोपचार तज्ज्ञ

बलदंड शरीरयष्टीच्या माणसांच्या तुलनेत मधुमेही, उच्च रक्तदाबाची, सकाळ-संध्याकाळ औषधे घेणाऱ्यांची संख्या आजूबाजूला जास्त दिसते; पण त्याहीपेक्षा मोठी संख्या असते ती ज्यांचे शरीर पिळदार नसले तरीही ज्यांना कोणतीही औषधे घ्यावी लागत नसणाऱ्यांची. याच लोकांनी आपल्या जीवनशैलीत योग्य बदल न केल्यास नजीकच्या भविष्यात ती वेगवेगळ्या व्याधींचा शिकार होतात. त्यांना आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी 'मेक युवरसेल्फ फिट अगेन' हा आजच्या काळातील मूलमंत्र ठरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मन, शरीर यांच्या संशोधनाची सुरुवात
मन आणि शरीर यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो, हे हजारो वर्षांपासून आपण जगाला सांगत आहोत. आपले ऋषिमुनी हाच संदेश देत होते. पण, आधुनिक काळात ऋषिमुनींच्या या संदेशाकडे आपलं दुर्लक्ष झालं. मात्र, हा प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राचा वारसा आधुनिक काळात महर्षी महेश योगी पुढं घेऊन गेले. पन्नास वर्षांपूर्वी महर्षी महेश योगी यांनी हार्वर्ड विद्यापीठ गाठलं. तेथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हर्बट बेन्सल यांच्या मदतीनं मन आणि शरीर यांच्याबाबतची अनेक संशोधनं केली. आधुनिक वैद्यकशास्त्र हे पुराव्याधारित आहे, त्यामुळे सुदृढ शरीराच्या व्यक्तीच्या मनाचं आरोग्य कसं असतं, तसंच वेगवेगळ्या कारणांनी मन खच्ची झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर त्याचा कोणता दुष्परिणाम होतो याचा शास्त्रीय अभ्यास महर्षी महेश योगी यांनी हार्वर्ड विद्यापीठात सुरू केला. मनाचं आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. शरीराचा एक विशिष्ट प्रकारचा प्रतिसाद असतो, त्याला वैद्यकीय परिभाषेत 'स्पेस रिस्पॉन्स' म्हणतात. बरोबर त्याच्या विरुद्ध प्रतिसाद आपल्याला निर्माण करता येतो. त्याला संशोधकांनी 'रिलॅक्से.शन रिस्पॉन्स' म्हटलं.

जाणून घ्या योगासनांविषय माहिती नसलेल्या गोष्टी 

'फिटनेस' नेमका कशासाठी?
शारीरिक तंदुरुस्तीतून (फिजिकल फिटनेस) आपलं शरीर बळकट होतं. ते कणखर, बलशाली होतं. त्याला 'रिजिलिअन्स' म्हटलं जातं. त्याच्या विरुद्ध जे असते ते 'फ्रोजाइल'. म्हणजे कमकुवतपणा, एक नाजूक व्यवस्था. रिजिलिअन्समध्ये खूप ताण सहन करू शकणारी व्यवस्था आपल्यामध्ये तयार होते. 'रिजिलिअन्स'मध्ये तुमचं मन आणि शरीर हे एकत्र आलेलं असतं. त्यात सुसंवाद असतो, एकसूत्रीपणा स्पष्टपणे दिसतो. त्यात मनाच्या आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यही सुदृढ असतं.

Video : माझा फिटनेस : हेल्दी जीवनशैलीचा फायदाच!

वैद्यकशास्त्राच्या शरीरक्रिया शास्त्र या शाखेत शारीरिक व्यायामाचं बारकाईनं विश्लेयषण केलं. कोणत्या प्रकाराच्या व्यायामानं नेमकं काय होतं, हे व्यवस्थित कळतं. चालणं, धावणं, सायकलिंग अशा हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या एरोबिक व्यायामानं आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्राणवायू घेतला जातो. असा एरोबिक व्यायाम असो, की वजन उचलण्याचा व्यायाम असो, या प्रत्येक शारीरिक व्यायामाचा कोणत्या अवयवावर कसा परिणाम होतो याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. हृदय, फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड अशा अवयवांवर झालेला परिणाम यातून मोजण्यात आला, त्याला 'एक्झयरसाईज फिजिओलॉजी' म्हटलं गेलं. त्याच वेळी रक्ताभिसरण, रक्तदाब अशांवर होणाऱ्या परिणामाचीही यात नोंद घेण्यात आली. या अभ्यासातून व्यायामाचा चांगला परिणाम शरीरावर होतो, हे अधोरेखित झालं. त्यामुळे तरुण वयात चांगल्या आरोग्यासाठी तंदुरुस्ती आवश्य,क ठरते. ज्येष्ठ नागरिकांनीही आठड्याभरात किमान १५० मिनिटं व्यायाम केला पाहिजे. म्हणजे रोज २० ते ३० मिनिटं व्यायामाची आवश्येकता आहे.

परिपूर्ण आरोग्यासाठी...
फक्त शारीरिक आरोग्य सुदृढ असून चालणार नाही. तुम्हाला परिपूर्ण आरोग्य हवं असल्यास मानसिक आरोग्यही उत्तम असलं पाहिजे, त्यासाठी तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार लागतात. तुमचा 'मूड पॉझिटिव्ह' असणं आवश्यदक असतं. तुमची झोप व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आपल्या आयुष्यात काहीतरी अर्थ आहे, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. शारीरिक आजाराच्या माणसालाही मानसिकदृष्ट्या बरं वाटणं, हे खूप महत्त्वाचं ठरतं.

झुम्बा नृत्यातून झिंगाट व्यायाम

निरोगी आणि आजारीतील दरी
आपण पूर्वापार असं म्हणत आलो आहोत, की जो आजारी नाही तो निरोगी; पण आधुनिक काळात हा विचार मागे पडला आहे. त्यामुळे पूर्वापार चालत आलेला संदर्भ आता बदलला आहे. निरोगी माणूस ते आजारी माणूस यात एक नवा टप्पा तयार होतोय. त्याला वैद्यकीय परिभाषेत 'ऍलोस्टॅटिक लोड' म्हणतात. या टप्प्यात जे लोक येतात ते निरोगी नसतात, तसेच ते पूर्णतः आजारीही नसतात. जगातील बहुसंख्य लोक याच टप्प्यात असल्याचं वेगवेगळ्या देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या टप्प्यातील लोकांनी स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही, स्वतःची जीवनशैली बदलली नाही, तर निश्चिलतपणे त्यांचा नैसर्गिक प्रवास पुढच्या आजारपणाच्या टप्प्याकडं सुरू राहणार आहे.

घराचा उंबरा ते रुग्णालयाची पायरी
घराचा उंबरा ते रुग्णालयाची पायरी या दरम्यानच्या टप्प्याकडे आपलं सर्वाधिक दुर्लक्ष होतं. कारण, रुग्णालयात गेल्यानंतर तुम्हाला सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत; पण रुग्णालयाच्या पायरीपर्यंत न पोचलेल्याची संख्या प्रचंड मोठी आहे. या लोकांसाठी 'माइंड, बॉडी, हेल्थ'ची गरज आहे.

केसांची इंटरेस्टिंग 'केस'

तुम्ही कुठे आहात?
अनारोग्याकडे जाणारा हा प्रवास आपल्याला आरोग्याकडे न्यायचा आहे
निरोगी आरोग्य (जगभरामध्ये फक्त ५ टक्के लोक निरामय जीवन जगतात.)

व्यायामाचा अभाव असल्याने आजाराच्या दिशेने जाणारे लोक. 50%
चुकीच्या जिवनशैलीमुळे वेगवेगळ्या व्याधींनी आजारी लोक. 30%
असाध्य व्याधींमुळे ग्रस्त लोक. 15%

loading image