वर्क फ्रॉम होममुळं होतो चयापचय क्रियेत अडथळा; यापासून बचावासाठी काय कराल?|Health tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

work from home
वर्क फ्रॉम होममुळं होतो चयापचय क्रियेत अडथळा; यापासून बचावासाठी काय कराल?|Health tips

वर्क फ्रॉम होममुळं होतो चयापचय क्रियेत अडथळा; यापासून बचावासाठी काय कराल?

कोरोनाचे संक्रमण (Corona) सध्या वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा लोकांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते बघता लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. त्यामुळे घरातून काम करणे हा एक चांगला पर्याय आहे, मात्र लोकांनी काही काळजी घेणे गरेजेच आहे. कारण, मध्यंतरी झालेल्या अभ्यानुसार यामुळे लोकांमध्ये शारीरिक निष्क्रियता, अपायकारक अन्नाचे सेवन, चयापचय विकार आणि लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. लॉकडाउनशी संबंधित या सवयी स्ट्रोकचा धोकाही वाढवतात असेही दिसून आले आहे.

Work From Home

Work From Home

एकाच जागी बराच वेळ बसू नका

एकावेळी बसून बराचवेळ काम करू नका. कामाच्या दरम्यान एकदातरी फिरायला जा. याशिवाय आहाराची विशेष काळजी घ्या. जास्त वेळ एकाच जागी बसण्याच्या सवयीमुळे चयापचय क्रियेवरही परिणाम होतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. सर्व वयोगटाच्या लोकांसाठी नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली होणे आवश्यक आहेत.

Exercise

Exercise

नियमित व्यायाम गरजेचा

अभ्यासानुसार, व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्याने फायदा होतो. तुम्ही बसून काम केले तरी अडचणी कमी येतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, तरूणांनी प्रत्येक आठवड्यात किमान 150 मिनिटे मध्यम किंवा 75 मिनिटे जोरदार व्यायाम केला पाहिजे. धावणे, सायकल चालवणे किंवा चालणे यासारख्या व्यायामांसह योगा करणे गरजेचे आहे.

Work from home impact on women health

Work from home impact on women health

बैठ्या कामामुळे धोका वाढला

शास्त्रज्ञांना अभ्यासात आढळून आले की बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरात रक्त प्रवाह, चयापचय, ग्लुकोज आणि जळजळ यासारख्या समस्या वाढतात. कालांतराने, याचा रक्तवाहिन्यांवर वाईच परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. घरून काम करणाऱ्या लोकांनी याबाबत खूप काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी Vaginal Health

health

health

शारीरिक निष्क्रियतेचे गंभीर परिणाम

स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की घरातून काम केल्याने लोकांमध्ये शारीरिक निष्क्रियता खूप वाढली आहे. जे लोक एका जागी आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना स्ट्रोकचा धोका इतर लोकांपेक्षा सातपट जास्त असू शकतो. शारीरिक निष्क्रियतेमुळे लठ्ठपणा आणि चयापचय विकार वाढत आहेत,

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top