महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी| Vaginal Health | How to Keep Vagina Clean & Healthy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaginal Health: How to Keep Vagina Clean & Healthy
महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी|Vaginal Health

महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी Vaginal Health

जर तुमच्या योनीतून दुर्गंधी (Vaginal Health) येत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.. यामागे अनेक कारणे असू शकतात, प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट लक्षणे आणि उपचार आहेत. पण, या समस्येवर साध्या घरगुती उपचारांनी उपचार केले जाऊ शकतात. पण, समस्या गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे हा अतिशय योग्य मार्ग आहे. (Vaginal Health: How to Keep Vagina Clean & Healthy)

हेही वाचा: लहान मुलांसाठी जगभरात कोविडच्या 'या' लसी आहेत उपलब्ध

बॅक्टेरियल वजायनोसिस (Bacterial vaginosis)

बॅक्टेरियल वजायनोसिस (BV) हे योनीतून दुर्गंधी येण्याचे मुख्य कारण आहे. अनेक स्त्रियांना कधीकधी लैंगिक संबंधानंतर याचा अनुभव येतो. पण ही समस्या लैंगिक संबंधामुळे होत नाही. किंबहुना योनीमध्ये, बॅक्टेरियल वजायनोसिसमुळे खाज सुटते आणि पातळ पांढरा, तपकिरी, पिवळा किंवा हिरवा स्त्राव होतो. त्यामुळे समस्या आणखी वाढते. अशासाठी शक्य तितक्या लवकर उपचार केले पाहिजे. कारण यामुळे इतर जननेंद्रियाच्या संसर्गाची शक्यता वाढते. गर्भधारणेदरम्यान अनेक अडचणी येऊ शकतात. अकाली प्रसूती आणि प्रसूतीनंतर संसर्ग होण्याची शक्यता वाढते यासाठी, डॉक्टरांकडून लवकर उपचार करून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष

ट्राइकोमोनियासिस (Trichomoniasis)

जर तुम्हाला ट्रायकोमोनियासिसचा त्रास होत असेल तर, योनीतून दुर्गंध येऊ शकतो. त्याला "ट्रिच" असेही म्हणतात. जेव्हा ट्रायकोमोनास योनिनालिस नावाचा प्रोटोझोअन परजीवी संभोग दरम्यान प्रसारित होतो तेव्हा हे घडते. हे कोणालाही होऊ शकते.यामुळे तुमच्या गुप्तांगाला खाज सुटणे आणि लघवी करताना वेदना आणि होते. यासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणे अतिशय गरजेचे आहे. दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण त्यामुळे गर्भधारणेनंतर अनेक अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा: नुकतंच लग्न झालेल्यांनी 'हे' पदार्थ खाताना जरा सांभाळून

sweat

sweat

खूप घाम येणे (Excessive sweating)

घाम आल्यावर स्वत:ला थंड करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम झाल्यावर किंवा एखादा तणाव असल्यास घाम येणे सामान्य बाब आहे. पण योनिमार्गात घाम आल्यावर तिथे वास यायला लागतो. त्यासाठी योनीमार्गाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. अशावेळी कॉटनच्या पॅंटीज वापरून तुम्हाला घामावर नियंत्रण ठेवावे लागेल. किंवा दोन वेळा अंडरपॅंट बदलावी लागेल. पण जर वास जास्तच येत असेल आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर मात्र नक्की डॉक्टरांशी संपर्क साधा.

हेही वाचा: फ्लॉवर खाण्याचे आहेत पाच फायदे माहिती आहेत का? हे वाचा

food

food

अनहेल्दी आहार(Unhealthy Food)

जर तुमची नैसर्गिक पीएच पातळी संतुलित असेल, तर तुम्हाला दुर्गंधी येण्याची शक्यता कमी आहे. तुमचा आहार या संतुलनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतो. म्हणून आहारात जीवनसत्त्वांचा समावेश करा. रोज फळे, भाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा.

हेही वाचा: प्राणायाम करताना या चूका टाळा! महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

स्वच्छता न ठेवल्याने ( Keep Clean)

जर योनीतून कोणताही स्त्राव, खाज न येता दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही योनीमार्ग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. त्यासाठी प्रयत्न करा. योनीमार्ग नीट साफ न केल्यामुळेही योनीतून दुर्गंधी येते.

हे लक्षात ठेवा

- लघवी आणि शौच झाल्यावर दोन्ही बाजू स्वच्छ पुसा.

- संभोगानंतर लघवी करा. त्यामुळे बॅक्टेरिया लगेच साफ होतील.

- दिवसातून दोनदा अंडरवेअर बदला.

- अंडरवेअर धुण्यासाठी साधे डिटर्जंट वापरा.

- सौम्य क्लीन्सरने आंघोळ करा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womenwomen bodyskin care
loading image
go to top