अत्यंत महत्त्वाचं : कोरोना काळात व्यायामाचे 'हे' प्रकार कराच, फुफ्फुसाला होणारा धोका टळेल..

अत्यंत महत्त्वाचं : कोरोना काळात व्यायामाचे 'हे' प्रकार कराच, फुफ्फुसाला होणारा धोका टळेल..

मुंबई : कोरोना आजारांमुळे रुग्णाच्या फुफ्फुसावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. लॅन्सेट येथे झालेल्या संशोधनात कोरोना महामारीच्या काळात ऍक्युट रेस्पिरेटरि डिस्ट्रेस सिंड्रोमच्या म्हणजेच श्वासनासंबंधी त्रासामुळे अनेक रुग्णांना ICU मध्ये दाखल करावे लागले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याची लक्षणे ओळखणे, त्यावर इलाज तसेच व्यवस्थापन करणे महत्वपूर्ण आहे.

कोरोना संसर्गाने बाधित रुग्ण जर रुग्णालयात दाखल असेल आणि त्याला श्वसनाचा त्रास होत असेल तर त्यात फारसे घाबरण्यासारखे नाही. मात्र तुम्ही कोरोना संसर्गामुळे होम क्वारंटाईन असाल किंवा तुम्हाला सौम्य लक्षणे असतील किंवा आजारातून बरे झाल्यानंतर जर का श्वसनाचा त्रास जाणवू लागला तर मात्र श्वासनासंबंधी आजाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. आपल्याला होणारा श्वसनाचा त्रास ओळखणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे त्यावर योग्य उपचार करणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पाटील धोके ओळखून काही महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने श्वासनासंबंधी होणारा त्रास कमी करण्यासाठी व्यायामाचे काही प्रकार सांगितले आहेत. हे प्रकार नियमित केल्यास त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे.

पलंगावर उंचवटा करा

पलंगावर एका बाजूने बऱ्याच उश्या ठेवून उंचवटा करा, त्यावर आपले डोके आणि मान व्यवस्थित राहील अश्या अवस्थेत पडून राहा. आपले गुडघे वाकलेले असावेत. 

खूर्चीवर पुढे सरकून बसा

खुर्चीवर बसा आणि आपल्या मांडीवर हात ठेवण्यासाठी किंवा खुर्चीच्या आर्म रेस्टवर विश्रांती घेण्यासाठी हळूवार आणि किंचित पुढे सरका. आपल्यासमोर टेबल असल्यास आपण आवश्यक असल्यास उशा किंवा उशीच्या मदतीने आपले डोके आणि मान टेबलावर विश्रांती घेण्यासाठी कंबरपासून पुढे झुकू शकता. या प्रकरणात आपले हात टेबलवर विसावले पाहिजे.

पुढे वाकून उभे राहा

टेबलासमोर उभे राहा, आपल्या शरीराचा छातीकडील भाग टेबलासमोर झुकवा,आपले हात ही टेबलावर समांतर ठेवा.

मागे झुकून उभे राहा

गुडघ्यातून वाकून गुडघ्यांवर बसा. आपले पाय भिंतीला टेकतील अशा स्थितीतराहून हळूहळू मागच्या बाजूला आपले शरीर झुकवा. UK नॅशनल हेल्थ सर्व्हिसने स्पष्टपाने नमूद केले आहे की, ज्या खोलीत तुम्ही आहात तेथे नैसर्गिक ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळेल याची खात्री करा. अन्यथा बंद खोलीत ऑक्सिजन सिलेंडरची तुम्हाला फार मदत मिळणार नाही. याशिवाय तुमच्या श्वसन प्रक्रियेत सुधार होईल अशा प्रकारचे डब्ल्यूएचओ ने सुचवलेले हलके व्यायामाचे प्रकार करणे गरजेचे आहे.

नियंत्रित श्वसनक्रिया 

योग्य स्थितीत बसून एक हात आपल्या छातीवर तर दुसरा हात आपल्या पोटावर ठेऊन श्वास घ्या.  डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. नाकाने हळुवार श्वास घ्या आणि तोंडावाटे सोडा. हळुवार श्वास घेणे, तो सोडणे अशा प्रकारे सहज श्वासोच्छ्वास घ्या. 

जेव्हा तुम्ही चालणे, धावणे, उंचावर चढणे अशा गोष्टी करत असतात तेव्हा अशा प्रकारचा व्यायाम महत्वाचा आहे. मात्र, श्वास घेण्यास त्रास होईल किंवा धाप लागेल अश्या गोष्टी करतांना त्या सलग न करता मध्ये मध्ये खंड करा आणि विश्रांती घ्या. त्यानंतर पुरेसा श्वास घ्या आणि मग आपलं काम सुरू करा.

अवघड काम करतांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्या. नाकाने श्वास घेऊन तोंडावाटे तोंडावाटे सोडा. 

( संकलन - सुमित बागुल )

during covid pandemic these exercise are very helpful check list of various exercise

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com