मृत्यूच्या १५ मिनिटं आधी व्यक्ती काय विचार करते? वैज्ञानिकांचा दावा | Brain Before Dead | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brain Before Dead
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी व्यक्ती काय विचार करते? वैज्ञानिकांचा दावा | Brain Before Dead

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी व्यक्ती काय विचार करते? वैज्ञानिकांचा दावा

मनुष्याच्या मृत्यूविषयी वैज्ञानिकांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. मरण्याच्या काही काळ आधीपर्यंत माणसाच्या मनात काय चालले आहे किंवा तो काय विचार करतो हे शास्त्रज्ञांनी (Scientist) शोधून काढले आहे. त्यामुळे जगात पहिल्यांदाच मृत्यूची (Death) वेळ जवळ आल्यावर कोणाच्या मनात (Mind) कोणते विचार येतात याची नोंद करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूच्या काही क्षण आधी माणसाचा मेंदू नेमका कोणता विचार करतो? मेंदू शास्त्रज्ञांनी एखाद्या व्यक्तीचा ब्रेन डेड झाल्यावर त्याच्या मेंदूमध्ये (Brain) कोणत्या प्रकारच्या आठवणी येतात याचा लावला आहे. मृत्यू जवळ येत असलेल्या व्यक्तीच्या मेंदूचे रेकॉर्डिंग केल्याने शास्त्रज्ञांना मानवी मेंदूचे काय होते हे समजून घेता येणार आहे.

हेही वाचा: कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल, तर जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट

काय करतो विचार?

फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्स (Frontiers in Aging Neuroscience ) या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. अभ्यासानुसार, प्रत्येकाचे मृत्यूपूर्वीचे आयुष्य त्याच्यासमोर घडत असते. त्यामुळे मृत्यूची वेळ जवळ आली की शेवटच्या क्षणी माणसाच्या मनाला त्याच्या आयुष्यातील चांगले क्षण आठवतात. अहवालानुसार, 87 वर्षीय व्यक्तीला एपिलेप्सी होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक त्या वृद्ध रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू होतो. यादरम्यान मृत्यूपूर्वीच्या काही क्षणांचे विचार रेकॉर्ड करण्यात आले.

हेही वाचा: शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट

आनंददायी काळाच्या आठवणी

या व्यक्तीच्या मृत्यापूर्वी त्याचे रॅकोर्डिंग घेण्यात आले होते. ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातील चांगले क्षण आणि त्याच्याशी निगडित आठवणींमध्ये हरवलेली होती. शास्त्रज्ञांच्या मते, मानवी मेंदूच्या लहरींचे रेकॉर्डिंग ईईजीवर (EEG ) करण्यात आले. ले लुईव्हिल गेमर विद्यापीठाचे न्यूरोसर्जन डॉ. अजमल झेम्मर (Dr Ajmal Zemmar) हे या संशोधनाचे लेखक होते. तज्ज्ञांच्या मते, मृत्यूच्या शेवटच्या काळात मानवी मेंदूला काही चांगले क्षण आठवतात. झेमरने फ्रंटियर्स सायन्स न्यूजला सांगितले की मेंदू आपल्या मृत्यूच्या आधी जीवनातील महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवतो. त्यामुळे याच गोष्टी मानवाच्या लक्षात राहतात.

हेही वाचा: कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार

Web Title: Dying Brain Thinking These Things Before 15 Minutes Of Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..