कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल, तर जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट

येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी २६ ते ४७ वयोगटातील २३८ सडपातळ लोकांचा अभ्यास केला.
Low Calorie Food For LongLife
Low Calorie Food For LongLife
Summary

ज्या तरुणांनी 14 टक्के कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ले, त्यांची थायमस ग्रंथी खूप चांगले काम करत होती, असे संशोधनात आढळले. या संशोधनात सहभागी झालेले येल सेंटर फॉर रिसर्च ऑन एजिंगचे संचालक आहारतज्ज्ञ विश्वदीप दिक्षित म्हणाले की, दिर्घायुष्य हवे असेल तर ही ग्रंथी नष्ट होण्यापासून वाचणे गरजेचे आहे.

आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही किती आणि काय खाता त्याला खूप महत्व आहे. कारण जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि निरोगी आहार (Food) घेतलात तर तुमच्या जीवनशैलीवर (Lifestyle) चांगला परिणाम होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार(Reserach) , जे लोक कमी खातात ते जास्त काळ जगतात असे समोर आले आहे. येल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कॅलरीजचे सेवन कमी केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली कार्यन्वित होऊ शकते .

Low Calorie Food For LongLife
'ही' पाच फळं नियमित खाल्ल्याने वजन होईल कमी!

असे आहे संशोधन

ज्या तरुणांनी 14 टक्के कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ले, त्यांची थायमस ग्रंथी खूप चांगले काम करत होती, असे संशोधनात आढळले. थायमस ग्रंथी हृदयाच्या वर असतात. या ग्रंथी रोगाशी लढणाऱ्या टी-पेशी निर्माण करतात. त्या ग्रंथीतून थायमोसिन नावाचा हार्मोन स्राव होतो. थायमस ग्रंथी नष्ट झाल्यामुळेच आपल्याला वृद्धत्व येते. मुलांमध्ये ही ग्रंथी मोठी असल्याचे पाहायला मिळते. या संशोधनात सहभागी झालेले येल सेंटर फॉर रिसर्च ऑन एजिंगचे संचालक आहारतज्ज्ञ विश्वदीप दिक्षित म्हणाले की, दिर्घायुष्य हवे असेल तर ही ग्रंथी नष्ट होण्यापासून वाचणे गरजेचे आहे. कॅलरीजचे प्रमाण कमी केल्याने शरीरातील जळजळ कमी होते, असे संशोधकांचे मत आहे.

Low Calorie Food For LongLife
केवढं मोठ्ठ कुटुंब! Family Tree मध्ये २ कोटी ७० लाख नातेवाईक, रिसर्चमध्ये दावा
calories
caloriesesakal

संशोधनातील निष्कर्ष

हे संशोधन सायन्समध्ये प्रकाशित झाले आहे. अभ्यासावेळी २६ ते ४७ वयोगटातील २३८ सडपातळ लोकांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी दोन तृतीयांश लोकांना कॅलरीचे कमी सेवन करण्यास सांगितले गेले. या अभ्यासातक सहभागी झालेल्या लोकांचे दैनंदिन शरीराचे वजन मोजले गेले. संशोधकांनी २ वर्षांनी या लोकांचा पुन्हा अभ्यास केला. त्यांचे एमआरआय स्कॅन केले. त्यानुसार आहारात कमी कॅलरी घेततेल्या लोकांच्या थायमस ग्रंथी अधिक चांगल्या प्रमाणात काम करत होत्या, असे आढळले. तसेच थायमस ग्रंथीभोवती असणाऱ्या टी पेशींची संख्या आणि चरबीची पातळी तपासली. त्यानुसार ज्या लोक कमी कॅलरी युक्त आहार घेतला होता त्यांच्या थायमस ग्रंथीभोवती सामान्य आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी चरबी आढळून आली, असे आढळून आले. ज्या लोकांनी २ वर्षे कमी कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन केले त्या लोकांमध्ये अधिक टी-पेशी निर्माण झाल्याचे आढळून आले, असे प्राध्यापक दिक्षीत यांनी सांगितले.

Low Calorie Food For LongLife
बाजरी, मेथीचं थालीपीठ कधी खालंय? जाणून घ्या 'हेल्दी' राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com