आरोग्यगाथा : तांब्यातील निखळ पाणी...

अभिषेक ढवाण
Thursday, 29 October 2020

तांब्याच्या भांड्याचा उपयोग म्हणजे, त्यामध्ये पाणी साठवून पाणी पिणे. बाजारात तांब्यापासून बनवलेल्या बाटल्या, हांडे इत्यादी मिळतात, पण प्रश्न हा उद्‍भवतो की, तांब्याचा भांड्यातून पाणी पिणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे काय?

तांब्याच्या भांड्याचा उपयोग म्हणजे, त्यामध्ये पाणी साठवून पाणी पिणे. बाजारात तांब्यापासून बनवलेल्या बाटल्या, हांडे इत्यादी मिळतात, पण प्रश्न हा उद्‍भवतो की, तांब्याचा भांड्यातून पाणी पिणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे काय?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तांब्याचा भांड्यामध्ये पाणी साठवून ते प्यायल्याने पाण्यामधील रोगकारक सूक्ष्मजंतू कमी होतात, असे आढळून आले आहे. या प्रक्रियेला ‘ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट’ असे म्हटले जाते. हा धातूंचा प्रभाव, विशेषत: जड धातू, अगदी कमी तीव्रतेमध्ये देखील होतो. पाणी तांब्याचा भांड्यात किंवा बाटलीत साठवले जाते, तेव्हा काहीप्रमाणात त्यातील रेणू किंवा ‘कॉपर आयन’ पाण्यामध्ये उतरतात. ते पाण्यामधील जंतूंना बांधले जातात आणि ते सूक्ष्मजंतूंच्या पेशींचे आवरण नष्ट करतात व परिणामी पाण्यातील जंतू नष्ट होतात. एका अभ्यासानुसार, तांब्याचा हा मानवी उपयुक्त प्रभाव पाण्यात असण्याऱ्या ई कोलाई, व्ही. कॉलरा आणि एस. फ्लेक्सनेरी अशा अनेक जंतूंवर होतो हे सिद्ध झालेले आहे. एका अभ्यासात हे जिवाणू पाण्यामध्ये मिसळून ते १२ तास तांब्याचा भांड्यात ठेवण्यात आले व १२ तासानंतर त्याची वाढ होते का हे तपासण्यात आले. तांब्याचा भांड्यात ठेवण्यात आलेल्या पाण्यामध्ये जिवाणूंची वाढ दिसली नाही. म्हणजेच, तांब्याचा भांड्यात साठवल्या गेलेले पाण्यामध्ये जंतू नष्ट होण्यास किंवा त्यांची वाढ रोखण्यात मदत होते.

चांदीचा भांड्यात काय होते?
तांब्याबरोबर चांदीच्या भांड्यात पाणी साठून त्याचा जिवाणूंवर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास केला गेला. प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये जिवाणू असलेले पाणी तांब्याच्या व चांदीचा भांड्यात ठेऊन ते ६, १२ व २४ तासांनी तपासण्यात आले. प्रत्येक वेळी किती टक्के जिवाणू तुलनेत किती कमी होतात हे तपासले गेले. त्यानुसार चांदीचे भांडे तांब्याचा भांड्याचा तुलनेत पाण्यातील जिवाणू सरासरी १० टक्के कमी नष्ट करते, असे आढळून आले.

पाणी किती वेळ साठवावे?
पाण्यातल्या जिवाणूंवर प्रभाव होण्यासाठी १२ ते २४ तास ते पाणी तांब्याचा भांड्यात साठवावे असे अभ्यासात आढळले. पाणी ६ तासांपेक्षा कमी ठेवल्यास त्याचा ऑलिगोडायनॅमिक परिणाम खूप कमी होतो व त्याचा जास्त उपयोग होत नाही. कॉपर शरीराला जास्त प्रमाणातही चांगले नाही. तांब्याच्या भांड्यात साठलेल्या पाण्यात तांब्याचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगी मर्यादेत असावे.

तांब्यातील पाण्याचे इतर फायदे 
तांब्याचा भांड्यात पाणी ठेवल्यास त्याचा पीएच वाढतो, म्हणजेच ते पाणी थोडे अल्कली धर्मीय किंवा कमी आम्लधर्मीय होते. शुद्ध पाण्याचा सरासरी पीएच ७ असतो, जो आम्ल आणि अल्कलीचा मध्य मानला जातो. अल्कली पाणी पिण्याने शरीराला अनेक फायदे होतात, असे मानले जाते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial Article abhishek dhawan