मोतिबिंदू झालाय का.. भासणार नाही ऑपरेशनची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eye surgery
मोतिबिंदू झालाय का.. भासणार नाही ऑपरेशनची गरज

मोतिबिंदू झालाय का.. भासणार नाही ऑपरेशनची गरज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उतारवयात अनेकांना मोतिबिंदू होतो. त्यावेळी ऑपरेशनची गरज निर्माण होते. योग्य इलाज झाला नाही तर दिसण्यावर परिणाम होतो. दृष्टी कायमची जाण्याचा धोका असतो. मात्र नुकत्याच सुरू असलेल्या संशोधनानुसार मोतिबिंदू झाल्यास शस्त्रक्रियेची गरज लागणार नाही.

अमेरिकेतल्या नेक्युटी फार्मास्युटिकल्स (Necuti Pharmaceuticals) या फार्मा कंपनीने एका इम्प्लांटचा (Implant for Cataract) शोध लावला आहे.याचे नाव एनपीआय-002 (NPI-002) आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बंदुकीच्या छऱ्याप्रमाणे दिसणारे हे इम्प्लांट डोळ्यातला मोतिबिंदू वाढू देत नाही. त्यामुळे ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही. याची लवकरच मानवी चाचणी सुरू करण्यात येणार आहे.

पन्नाशीनंतर शरीरातल्या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी होते. तसेच डोळ्यांमध्ये कॅल्शियम जमा होते. यामुळे डोळ्याची नैसर्गिक लेन्स खराब होते. अशात जर मोतिबिंदू झाला असेल तर सगळ धूसर दिसतं. कंपनीचे नपीआय-002 हे इम्प्लांट डोळ्यात इंजेक्ट केलं जातं. ते थोड्या-थोड्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स सोडते. त्यामुळे डोळ्य़ातला कॅल्शिअमचा स्तर वाढत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना शस्त्रक्रियेची गरज लागत नाही. कंपनी या मानवी चाचणीसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 30 लोकांना प्रयोगासाठी सहभागी करून घेणार आहे.

loading image
go to top