esakal | Fact Check - शाकाहार आणि धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी? PIBचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

धुम्रपान

सीएसआयआरने एक अहवाल प्रसिद्ध केल्याचं सांगत असा दावा करण्यात आला होता की, धुम्रपान करणारे आणि शाकाहारी व्यक्तींना कोरोनाची लागण इतरांच्या तुलनेत कमी होते.

Fact Check - शाकाहार आणि धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गापेक्षा त्याबद्दलच्या अफवाच वेगानं पसरत आहेत. सध्या भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह रेमडिसिव्हिर औषधांचा तुटवडा भासतोय. दरम्यान, सीएसआयआरने एक अहवाल प्रसिद्ध केल्याचं सांगत असा दावा करण्यात आला होता की, धुम्रपान करणारे आणि शाकाहारी व्यक्तींना कोरोनाची लागण इतरांच्या तुलनेत कमी होते. यामध्ये असंही सांगितलं होतं की, निकोटीनचा कोरोना विषाणूवर होणाऱ्या परिणामाचा अधिक अभ्यास करण्याही आवश्यकता आहे. मात्र आता अशा प्रकारचा कोणताही अहवाल आयसीएमआरने प्रसिद्ध केला नसल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.

पीआयबीने म्हटलं की, सीएसआयरने शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका तुलनेनं कमी असतो अशा प्रकारचं कोणतही आर्टिकल किंवा प्रेस नोट प्रसिद्ध केलेली नाही. सीएसआयआरचं असं म्हणणं आहे की, ज्या आर्टिकलवरून असा अर्थ काढला त्यात वेगळीच माहिती होती. फायबरयुक्त आहार असल्याच त्यामुळे कोरोनाविरोधात प्रतिकारासाठी मदत होऊ शकते किंवा त्याचा धोका कमी होऊ शकतो असं म्हटलं होतं.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात कोरोनामध्ये ट्रेस तत्वं, न्यूट्रास्यूटिकल्स आणि प्रोबायोटिक्समुळे काय होतं यावर संशोधन केलं गेलं. नुकताच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असला तरी निकोटीनचा कोरोना विषाणूवर होणाऱ्या परिणामावर अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना

शाकाहार आणि धुम्रपानामुळे कोरोनापासून बचाव होतो यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं पीआयबीने स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये कोणत्याही निकषांची पडताळणी केल्याशिवाय त्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. यामुळेच सीएसआयआरचे असे म्हणणे आहे की, शाकाहार करणं आणि धुम्रपान यामुळे कोरोनाचा धोका कमी असतो अशा निष्कर्षावर आताच पोहोचता येणार नाही.

loading image
go to top